मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये भारताचा विजय होणार! गावसकरांनी सांगितलं कारण

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये भारताचा विजय होणार! गावसकरांनी सांगितलं कारण

गावसकरांनी सांगितलं टीम इंडियाच्या विजयाचं कारण

गावसकरांनी सांगितलं टीम इंडियाच्या विजयाचं कारण

भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये इंग्लंडच्या टीमचं (India vs England) पुनरागमन आता जवळपास अशक्य आहे.

  • Published by:  Shreyas

हेडिंग्ले, 22 ऑगस्ट : भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये इंग्लंडच्या टीमचं (India vs England) पुनरागमन आता जवळपास अशक्य आहे, कारण टीम इंडियाने लॉर्ड्स टेस्ट (Lords Test) जिंकून मनोवैज्ञानिक आघाडी घेतली आहे. इंग्लंडला सीरिजमध्ये पुनरागमन करायचं असेल, तर खेळाडूंना चमत्कारिक कामगिरी करावी लागेल, असंही गावसकर म्हणाले.

भारताने लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा 151 रनने पराभव केला. याचसोबत त्यांनी 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. दोघांमध्ये नॉटिंघममध्ये झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती.

टेलिग्राफमध्ये लिहिलेल्या आपल्या स्तंभात गावसकर म्हणाले, 'टीम इंडियाने इंग्लंडला मनोवैज्ञानिक धक्का दिला, त्यामुळे टेस्ट सीरिजमध्ये पुनरागमन करण्यासाठी इंग्लंडला खडतर प्रवास करावा लागणार आहे. क्रिकेट अनिश्चिततांचा खेळ आहे, आणि गोष्टी नाट्यमयरित्या बदलतात, पण असं करण्यासाठी चमत्काराची गरज आहे.'

'लॉर्ड्स टेस्टच्या पाचव्या दिवशी सगळ्यांना इंग्लंड जिंकेल, असंच वाटत होतं, पण अखेरच्या दिवशी 180 रन करणंही कठीण असतं. इंग्लंडची टीम 120 रनवर ऑल आऊट झाल्याचं आपण पाहिलं. इंग्लंडने ही मॅच मोठ्या अंतराने हरली. इंग्लंडची टीम जो रूटवर अवलंबून आहे. जर तो मोठी इनिंग खेळण्यात अपयशी ठरला तर इंग्लंडची बॅटिंग गडगडते. भारताविरुद्ध लॉर्ड्समध्येही असंच झालं,' असं गावसकरांनी त्यांच्या स्तंभात लिहिलं.

जो रूटने (Joe Root) या टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन टेस्टमध्ये 128 पेक्षा जास्तच्या सरासरीने 386 रन केले, यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे.

'इंग्लंडला टीम बेन स्टोक्स (Ben Stokes) सारख्या दिग्गज ऑलराऊंडरची कमी जाणवत आहे, कारण तो बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही अंतर निर्माण करतो. मी रूट असतो तर स्टोक्सला परत आणलं असतं आणि त्याला मॅच खेळवण्याचा प्रयत्न केला असता. बेन स्टोक्स इंग्लंडची परिस्थिती बदलू शकतो,' असं वक्तव्यही गावसकरांनी केलं. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टला 25 ऑगस्टपासून हेडिंग्लेमध्ये सुरूवात होणार आहे.

First published:

Tags: India vs england, Sunil gavaskar