मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : शुभमन गिल भारतात परत येणार, तर राहुलबाबत टीमचा मोठा निर्णय

IND vs ENG : शुभमन गिल भारतात परत येणार, तर राहुलबाबत टीमचा मोठा निर्णय

इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज (India vs England) सुरू होण्याआधीच शुभमन गिल (Shubhaman Gill) भारतात परतणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने (BCCI) गिलला परत बोलावलं आहे.

लंडन, 7 जुलै : इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज (India vs England) सुरू होण्याआधीच शुभमन गिल (Shubhaman Gill) भारतात परतणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने (BCCI) गिलला परत बोलावलं आहे. गिल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर (WTC Final) दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या पायाला झालेली दुखापत बरी व्हायला तीन महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी लागू शकतो. गिलऐवजी अजूनपर्यंत कोणत्याही ओपनरची निवड करण्यात आलेली नाही.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाकडे ओपनर म्हणून आता फक्त मयंक अग्रवालचाच (Mayank Agarwal) पर्याय उपलब्ध आहे. तसंच स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून अभिमन्यू इश्वरन आहे. केएल राहुलही (KL Rahul) टेस्ट ओपनर आहे, पण टीम मॅनजमेंट आता त्याला ओपनिंगची जबाबदारी देऊ इच्छित नाही. तर तो आता मधल्या फळीत खेळताना दिसू शकतो.

क्रिकबझच्या या वृत्तामध्ये टीम इंडियाच्या मॅनजमेंटने शुभमन गिलऐवजी कोणत्याच खास खेळाडूची मागणी केली नव्हती. म्हणजेच टीमने पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) किंवा देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांची कधीही मागणी केली नसल्याचं आता समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गिलचा पर्याय शोधण्याची जबाबदारी निवड समितीवरच सोडण्यात आली आहे.

टीम इंडियाला शुभमन गिलचा पर्याय लवकर मिळण्याची शक्यता धूसर आहे. पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल सध्या श्रीलंकेत वनडे आणि टी-20 सीरिजसाठी (India vs Sri Lanka) खेळणार आहेत. श्रीलंकेहून ब्रिटनला जाणाऱ्या लोकांना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

First published:
top videos

    Tags: India vs england, Kl rahul, Team india