मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : गिलच्या बदली खेळाडूबाबत गांगुलीचं मोठं वक्तव्य, सांगितलं निर्णय कोण घेणार

IND vs ENG : गिलच्या बदली खेळाडूबाबत गांगुलीचं मोठं वक्तव्य, सांगितलं निर्णय कोण घेणार

भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यात पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमधून शुभमन गिल (Shubhaman Gill) दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. गिल खेळू शकत नसल्यामुळे आता त्याच्याऐवजी ओपनिंगला कोण खेळणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 17 जुलै : भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यात पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमधून शुभमन गिल (Shubhaman Gill) दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. गिल खेळू शकत नसल्यामुळे आता त्याच्याऐवजी ओपनिंगला कोण खेळणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. गिलच्या दुखापतीमुळे आता मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यासाठी टीमचे दरवाजे खुले झाले आहेत.

बीसीसीआयने (BCCI) अजूनपर्यंत गिलच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) गिलच्या बदली खेळाडूबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. गिलच्या बदली खेळाडूबाबत टीम मॅनेजमेंट निर्णय घेईल असं गांगुली म्हणाला.

न्यूज18 सोबत बोलताना गांगुली म्हणाला, मी या गोष्टींमध्ये दखल देत नाही. टीम मॅनेजमेंट याबाबतचा निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजपासून भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात करणार आहे, त्यामुळे गिलऐवजी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांची टेस्ट टीममध्ये निवड होईल, असं बोललं जात आहे.

दोन्ही खेळाडू सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. इंग्लंडमध्ये असलेल्या टीम इंडियाने दोन खेळाडूंची ओपनर म्हणून मागणी केली होती, याबाबतचा ई-मेल निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्याकडे केली होती. चेतन शर्मा यांनी मात्र याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही, त्यामुळे टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची चर्चाही रंगली.

भारत-इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. याआधी टीम इंडिया इंग्लंडमध्ये काही सराव सामने खेळणार आहे. गिलच्या दुखापतीनंतर टीमला आणखी एक धक्का बसला आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तो सध्या क्वारंटाईन झाला आहे, त्यामुळे सराव सामन्यातही तो खेळणार नाही.

First published:
top videos

    Tags: BCCI, Cricket, India vs england, Sourav ganguly