मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : शोएब अख्तरचा सगळ्यात मोठा फॅन वाढवणार विराटची डोकेदुखी!

IND vs ENG : शोएब अख्तरचा सगळ्यात मोठा फॅन वाढवणार विराटची डोकेदुखी!

विराटचं टेन्शन वाढवणार इंग्लंडचा हा खेळाडू

विराटचं टेन्शन वाढवणार इंग्लंडचा हा खेळाडू

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडीवर आहे.

    लंडन, 21 जुलै : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडीवर आहे. सीरिजची तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून लीड्सवर होणार आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानचा माजी दिग्गज फास्ट बॉलर शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) फॅन कोहलीची डोकेदुखी वाढवू शकतो. फास्ट बॉलर साकिब महमूद (Sakib Mahamood) भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमधून इंग्लंडकडून पदार्पण करू शकतो. लहानपणापासूनच साकिब शोएब अख्तरला त्याचा हिरो मानतो. डेली मेलसोबत बोलताना साकिब म्हणाला, 'मी जास्त जलद बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय. मी 87-88 मैल प्रती तासाने बॉलिंग करतो, पण मला 90 मैल वेगाने बॉलिंग करायची आहे. टेस्टमध्ये पदार्पण करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे.' वेग, रिव्हर्स स्विंग आणि यॉर्करमुळे साकिबची तुलना अनेकवेळा पाकिस्तानचा दिग्गज फास्ट बॉलर वकार युनूससोबत (Waqar Younis) होते. साकिब इंग्लंडकडून 7 वनडे आणि 9 टी-20 मॅच खेळला आहे. मला कायमच फास्ट बॉलिंग आवडायची. मी जेव्हा लहान होतो तेव्हा सर्वाधिक फास्ट बॉलर होते, त्यामुळे ते जेव्हा खेळायचे तेव्हा मी टीव्हीसमोर बसायचो, असं साकिबने सांगितलं. साकिबला तिसऱ्या टेस्टमध्ये ऑलराऊंडर सॅम करनच्याऐवजी (Sam Curran) टीममध्ये संधी मिळू शकते. करनला पहिल्या दोन मॅचमध्ये फक्त 1 विकेट मिळाली. लॉर्ड्स टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england

    पुढील बातम्या