मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 'त्याची बॅटिंग समजण्या पलीकडची', सेहवागच्या भारतीय खेळाडूवर निशाणा

IND vs ENG : 'त्याची बॅटिंग समजण्या पलीकडची', सेहवागच्या भारतीय खेळाडूवर निशाणा

सुरक्षेतील चूक पाहून सेहवाग भडकला

सुरक्षेतील चूक पाहून सेहवाग भडकला

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली दुसरी टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे, पण टीम इंडियाच्या या रणनितीवर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

लंडन, 16 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली दुसरी टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्या 89 रनच्या नाबाद पार्टनरशीपमुळे इंग्लंडला विजयासाठी 272 रनचं आव्हान मिळालं. भारताने पहिल्या इनिंगमध्ये 364 रन, तर इंग्लंडने 391 रन केले, यानंतर भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 298/8 या स्कोअरवर इनिंग घोषित केली.

मॅचच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने 82 ओव्हर बॅटिंग केली आणि 181 रन केले, म्हणजेच 2.2 च्या इकोनॉमी रेटने भारतीय बॅट्समन खेळले. टीम इंडियाच्या या रणनितीवर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गरज पडली तेव्हा सुनिल गावसकरही (Sunil Gavaskar) जलद खेळायचे, मग चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) असं का करू शकत नाही? असा सवाल सेहवागने विचारला आहे. पुजाराची बॅटिंग समजण्यापलीकडची आहे, असं सेहवाग म्हणाला. मॅचच्या चौथ्या दिवशी पुजारा संथ खेळला. 206 बॉल बॅटिंग करून पुजाराने 45 रन केले, त्याचा स्ट्राईक रेटही 22 चा होता.

मेलबर्नमध्ये गावसकरांनी केली कमाल

1981 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया तीन मॅचच्या सीरिजमध्ये 0-1 ने पिछाडीवर होती. मेलबर्नमध्ये झालेल्या अखेरच्या टेस्टमध्ये टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 237 रन केले. गावसकरांनी 70 बॉल खेळून 10 रन केले. या इनिंगमध्ये गावसकरांचा स्ट्राईक रेट 14 चा होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने 419 रन केले. टीम इंडियाने दुसऱ्या इनिंगमध्ये 324 रन केले. सीरिज बरोबरीत सोडवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं होतं. गावसकरांनी दुसऱ्या इनिंगमध्ये 39 च्या स्ट्राईक रेटने 180 बॉल खेळून 70 रन केले. यामुळे कांगारूंना विजयासाठी 143 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 83 रनच करता आले, त्यामुळे भारताने हा सामना 59 रनने जिंकला.

First published:
top videos

    Tags: India vs england, Pujara, Virender sehwag