Home /News /sport /

IND vs ENG : 'बेस्ट' कामगिरी करणाऱ्या दोघांना मांजरेकरांनी केलं दुसऱ्या टेस्टमधून बाहेर

IND vs ENG : 'बेस्ट' कामगिरी करणाऱ्या दोघांना मांजरेकरांनी केलं दुसऱ्या टेस्टमधून बाहेर

दुसऱ्या टेस्टसाठी मांजरेकरांनी निवडली Playing XI

दुसऱ्या टेस्टसाठी मांजरेकरांनी निवडली Playing XI

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी दुसऱ्या टेस्टसाठी (India vs England) आपली प्लेइंग-11 घोषित केली आहे.

    लंडन, 9 ऑगस्ट : भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी दुसऱ्या टेस्टसाठी (India vs England) आपली प्लेइंग-11 घोषित केली आहे. धक्कादायक म्हणजे मांजरेकर यांनी पहिल्या टेस्टमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांना बाहेर केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातली पहिली टेस्ट ड्रॉ झाली. अखेरच्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. पाच टेस्ट मॅचच्या या सीरिजची दुसरी टेस्ट 12 ऑगस्टपासून लॉर्ड्सवर होणार आहे. संजय मांजरेकर आणि रविंद्र जडेजा यांच्यात याआधीही वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये त्यांनी शार्दुल ठाकूरऐवजी हनुमा विहारीला टीममध्ये घेण्याबाबतचं वक्तव्य केलं. सोनी स्पोर्ट्ससोबत बोलताना मांजरेकर म्हणाले, 'जर ऋषभ पंत (Rishabh Pant) सातव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला तर तो आणखी धोकादायक ठरेल. पंत खालच्या क्रमकांच्या बॅट्समनसोबत खेळू शकतो. मी हनुमा विहारीसोबत आहे, कारण त्याने ऑस्ट्रेलियात अडीच तासांपेक्षा जास्त काळ बॅटिंग करून मॅच ड्रॉ केली.' हनुमा विहारीने (Hanuma Vihari) जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी टेस्टमध्ये अखेरच्या दिवशी अश्विनसोबत (R Ashwin) बॅटिंग करून मॅच वाचवली होती. इंग्लंडमधल्या स्विंग होणाऱ्या बॉलसमोर विहारी उपयोगी ठरेल, असं मांजरेकरांना वाटतं. विहारी काही दिवसांपूर्वी काऊंटीमध्ये वार्विकशायरकडून खेळत होता. याशिवाय अश्विनला पहिल्या टेस्टमधून बाहेर करणं चुकीचं होतं, कारण तो कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेऊ शकतो. दुसऱ्या टेस्टमध्ये अश्विनला संधी द्यावी, अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी दिली. भारताने दुसऱ्या टेस्टमध्ये तीन फास्ट बॉलर घेऊन खेळावं, असं मांजरेकर म्हणाले. त्यांनी टीममध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) टीममध्ये स्थान दिलं. इशांत शर्मा (Ishant Sharma) फिट आहे का नाही, ते मला माहिती नाही, पण मी सिराजला संधी देईन कारण त्याच्यामध्ये 5 विकेट घेण्याची क्षमता आहे, असं वक्तव्य मांजरेकर यांनी केलं. भारत आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी टेस्ट लॉर्ड्सवर होणार आहे. या मैदानातली भारताची कामगिरी निराशाजनक झाली आहे. लॉर्ड्सवर 18 पैकी फक्त 2 टेस्टमध्ये भारताला विजय मिळवता आला. संजय मांजरेकर यांनी जरी दुसऱ्या टेस्टमधून रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरला संधी दिली नसली तरी या दोघांनी पहिल्या टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली. जडेजाने पहिल्या इनिंगमध्ये 56 रन केले, त्यामुळे भारताला 250 च्या पुढे स्कोअर नेता आला आणि 95 रनची मोठी आघाडी मिळाली. याशिवाय शार्दूल ठाकूरने मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या. पहिल्यांदाच भारतीय फास्ट बॉलरनी इंग्लंडमध्ये एखाद्या टेस्टमध्ये सगळ्या 20 विकेट मिळवल्या. दुसऱ्या टेस्टसाठी मांजरेकरांची टीम रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर.अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, R ashwin, Ravindra jadeja

    पुढील बातम्या