मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND VS ENG : पहिले सिक्स, मग आऊट! इंग्लंडच्या सापळ्यात अडकला रोहित, पुन्हा केली तिच चूक, VIDEO

IND VS ENG : पहिले सिक्स, मग आऊट! इंग्लंडच्या सापळ्यात अडकला रोहित, पुन्हा केली तिच चूक, VIDEO

मार्क वूडच्या सापळ्यात अडकला रोहित

मार्क वूडच्या सापळ्यात अडकला रोहित

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची (India vs England) सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. 27 रनवर टीमचे दोन्ही ओपनर आऊट झाले. मार्क वूडने (Mark Wood) केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
लंडन, 15 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची (India vs England) सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. 27 रनवर टीमचे दोन्ही ओपनर आऊट झाले. मार्क वूडने (Mark Wood) केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पहिल्या इनिंगमध्ये शतक करणारा केएल राहुल 5 रन करून पॅव्हेलियनमध्ये गेला. राहुलच्या बॅटच्या कडेला बॉल लागला, यानंतर विकेट कीपर जॉस बटलरने (Jos Buttler) कॅच पकडताना कोणतीही चूक केली नाही. रोहित शर्मा 36 बॉलमध्ये 21 रन करून आऊट झाला. रोहित शर्माची विकेट मात्र इंग्लंडने सापळा रचून घेतली. मार्क वूडने 12 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्माला बाऊन्सर टाकायला सुरुवात केली. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला रोहित शर्माने बाऊन्सरवर पूल शॉट मारून सिक्स मारली. यानंतर ओव्हरचा चौथा बॉलही वूडने बाऊन्सरच टाकला, या बॉलवरही रोहित मोठा शॉट खेळण्यासाठी गेला, पण बॉल डोक्यावरून जात असल्याचं लक्षात आल्यानंतर रोहितने शेवटच्या क्षणी शॉट मारण्याचा विचार बदलला. ओव्हरचा सहावा बॉलही वूडने बाऊन्सर टाकला, या बॉलवरही रोहितने पूल शॉट मारला, पण स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या मोईन अलीने (Moeen Ali) रोहितला आऊट केलं. लॉर्ड्सआधी नॉटिंघममध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही रोहित शर्मा पूल शॉट मारून आऊट झाला होता. ओली रॉबिनसनने टाकलेल्या बाऊन्सरवर रोहितने पूल शॉट मारला, पण फाईन लेगवर उभ्या असलेल्या सॅम करनने रोहितचा कॅच पकडला. रोहितने केला पूल शॉटचा बचाव मॅचनंत झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने त्याच्या विकेटविषयी आणि तो शॉट मारण्याविषयी प्रतिक्रिया दिली. 'तुम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागतात. मीही तेच केलं. जेव्हा बॉल स्विंग होत असतो, तेव्हा ओपनर म्हणून तुम्हाला बॅटिंगच्या वेगवेगळ्या पैलूंचा वापर करावा लागतो. या परिस्थितीमध्ये खेळणं सोपं नसतं, पण कठीण परिस्थितीमध्ये खेळण्यासाठी तुम्ही स्वत:ला आव्हान देत असता. मी देखील तेच करण्याचा प्रयत्न करत आहे,' असं रोहित म्हणाला. रोहितने आऊट झाला त्या हूक शॉटलाही पाठिंबा दिला आहे. जर बॉल मारण्यासारखा असेल, तर मी तो नक्की मारेन, असं रोहितने सांगितलं. तो माझा आवडता शॉट आहे, त्यामुळे मी शॉट खेळलो, असं वक्तव्य रोहितने केलं होतं.
First published:

Tags: India vs england, Rohit sharma

पुढील बातम्या