लंडन, 14 ऑगस्ट : टीम इंडियाचा फास्ट बॉलर इशांत शर्माने (Ishant Sharma) टेस्ट क्रिकेमध्ये नवा विक्रम केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी (India vs England 2nd Test) इशांत शर्माने जॉस बटलरची (Jos Butller) विकेट घेतली, याचसोबत त्याच्या घराच्या बाहेर टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट पूर्ण झाल्या. भारताकडून हा विक्रम करणारा इशांत शर्मा फक्त चौथाच खेळाडू ठरला आहे.
इशांत शर्माने घराच्या बाहेर 61 टेस्टच्या 107 इनिंगमध्ये 33 च्या सरासरीने हा रेकॉर्ड केला. 9 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि एकदा मॅचमध्ये 10 विकेट घेण्याचा पराक्रमही इशांतने केला आहे. इशांतने 103 टेस्टमध्ये 32 च्या सरासरीने 307 विकेट घेतल्या, यात 11 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि एकदा मॅचमध्ये 10 विकेट आहेत.
Ishant finally gets his reward 👊 Kept persisting at that off stump & one finally knocks down Buttler 💪 Tune into #SonyLIV now 👉 https://t.co/E4Ntw2hJX5 📺📲#ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #JosButtler #Wicket pic.twitter.com/9KEzjErK75
— SonyLIV (@SonyLIV) August 14, 2021
परदेशात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) नावावर आहे. त्याने 69 मॅचमध्ये 36 च्या सरासरीने 269 विकेट घेतल्या. कुंबळेला 10 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि एकदा मॅचमध्ये 10 विकेट घेता आल्या. याशिवाय कपिल देव (Kapil Dev) यांनी 66 मॅचमध्ये 215 विकेट आणि झहीर खानने (Zaheer Khan) 54 टेस्टमध्ये 207 विकेट मिळवल्या.
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमधली पहिली टेस्ट ड्रॉ झाली, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने 364 रन केले, पण जो रूटने (Joe Root) सीरिजमधलं आणखी एक शतक करत पुन्हा एकदा इंग्लंडला वाचवलं. टीम इंडियाला लॉर्ड्सवर 18 पैकी फक्त 2 टेस्टमध्ये विजय मिळवता आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england