मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : इंग्लंडच्या खेळाडूंकडून बॉल टॅम्परिंग!, लॉर्ड्सवरून समोर आला धक्कादायक VIDEO

IND vs ENG : इंग्लंडच्या खेळाडूंकडून बॉल टॅम्परिंग!, लॉर्ड्सवरून समोर आला धक्कादायक VIDEO

इंग्लंडच्या खेळाडूंवर बॉल टॅम्परिंगचा आरोप

इंग्लंडच्या खेळाडूंवर बॉल टॅम्परिंगचा आरोप

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरू असलेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. मॅचच्या चौथ्या दिवशी भारताची बॅटिंग सुरू असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांच्या पायाखाली बॉल (Ball Tampering) ठेवला.

  • Published by:  Shreyas
लंडन, 15 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरू असलेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. मॅचच्या चौथ्या दिवशी भारताची बॅटिंग सुरू असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांच्या पायाखाली बॉल (Ball Tampering) ठेवला. याचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इंग्लंडच्या खेळाडूंच्या बुटांवर खिळे होते, हे खिळे बॉलला लागल्यामुळे बॉलची परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण होते, त्यामुळे रिव्हर्स स्विंग व्हायला मदत होते. इंग्लंडच्या खेळाडूंच्या या कृत्यावर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने टीम इंडियाच्या 3 विकेट घेतल्या. केएल राहुल (KL Rahul), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) स्वस्तात आऊट झाले, यानंतर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि रहाणेने (Ajinkya Rahane) टीम इंडियाचा डाव सावरायला सुरुवात केली आणि टीमची पडझड थांबवली. दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारताने एकही विकेट गमावली नाही. याच सत्रात इंग्लंडच्या खेळाडूंनी पायाखाली बॉल घेतल्याचं समोर आलं आहे. बॉल टॅम्परिंगचे आरोप झाल्यानंतर आता इंग्लंडचे खेळाडू नेमकं काय स्पष्टीकरण देतात हे पाहावं लागणार आहे. याआधी 2018 साली दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) यांच्यातल्या टेस्टमध्ये झालेल्या बॉल टॅम्परिंगच्या वादामुळे क्रिकेट विश्व हादरलं होतं. ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरून बॅन्क्रॉफ्ट (Cameron Bancroft) याने सॅण्ड पेपरचा वापर करून बॉलशी छेडछाड केली होती. ब्रॅन्क्रॉफ्टचं हे कृत्य कॅमेरामध्ये कैद झालं. यानंतर ऑस्ट्रेलियाचा तेव्हाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांच्यावर एका वर्षाची आणि बॅन्क्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली.
First published:

Tags: India vs england

पुढील बातम्या