Home /News /sport /

IND vs ENG : रोहितला सीरिजमध्ये कशामुळे मिळालं यश? सचिनने सांगितलं कारण

IND vs ENG : रोहितला सीरिजमध्ये कशामुळे मिळालं यश? सचिनने सांगितलं कारण

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये (India tour of England) रोहित शर्मा (Rohit Sharma) शानदार फॉर्ममध्ये आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही रोहितच्या या फॉर्मचं कौतुक केलं आहे.

    लंडन, 5 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये (India tour of England) रोहित शर्मा (Rohit Sharma) शानदार फॉर्ममध्ये आहे. चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्माने धमाकेदार शतक केलं. टेस्ट क्रिकेटमधलं रोहितचं हे 8 वं शतक होतं. तसंच भारताबाहेर पहिल्यांदाच रोहितला टेस्ट क्रिकेटमध्ये शतक करता आलं. टीम इंडियाला जेव्हा गरज होती तेव्हाच रोहित शर्माने हे शतक केलं. इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये 99 रनची महत्त्वाची आघाडी मिळाली होती. त्यावेळी रोहितने पहिले केएल राहुलसोबत (KL Rahul) 83 रनची आणि मग चेतेश्वर पुजारासोबत (Cheteshwar Pujara) 153 रनची पार्टनरशीप केली. रोहितच्या या खेळीमुळे भारताची आघाडी 200 रनच्या पुढे पोहोचली. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही रोहित शर्माच्या या खेळीचं कौतुक केलं आहे. सचिन तेंडुलकरने याबाबत एक ट्वीट केलं आहे. रोहित या सीरिजमधल्या सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे, असं सचिन म्हणाला. तसंच त्याने पुजाराचंही कौतुक केलं. मला कायमच पुजाराच्या क्षमतेवर विश्वास होता, त्याने ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं, असं सचिनने सांगितलं. 'रोहितने या सीरिजमध्ये बॅटिंगचा स्तर आणखी उंचावला आहे. तो क्रीजवर सगळ्यात सहज बॅटिंग करणारा खेळाडू दिसत आहे. शॉट खेळताना तो कोणतीही घाई करत नाही. सेट झाल्यानंतर तो मोठे शॉट्स मारत आहे. त्याच्या बॅटिंगमध्ये आलेला बदल, त्याने या सीरिजमध्ये खेळलेल्या बॉलच्या संख्येवरून दिसून येतो,' असं सचिन त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला. या शतकात कोणत्याही भारतीय ओपनरने इंग्लंडमध्ये सर्वाधिक बॉल खेळलेली रोहितची ही तिसरी खेळी आहे. रोहितने 127 रन करायला 256 बॉल खेळले. या यादीत मुरली विजय पहिल्या क्रमांकावर आणि राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुरली विजयने 2014 साली 361 बॉल खेळून 146 रन केले, तर द्रविडने 2011 साली 266 बॉल खेळून नाबाद 146 रन केले होते. रोहितला रेकॉर्ड करण्याची संधी सीरिजची एक टेस्ट अजून बाकी आहे, त्यामुळे रोहितकडे आणखी एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे. इंग्लंडमध्ये एका सीरिजमध्ये सर्वाधिक बॉल खेळणारा भारतीय ओपनर बनण्याची संधी रोहितकडे आहे. रोहितने या सीरिजमध्ये 856 बॉल खेळले. सुनिल गावसकर 1199 बॉलसह पहिल्या आणि मुरली विजय 1054 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Rohit sharma, Sachin tendulkar

    पुढील बातम्या