IND vs ENG : रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट आला, T20 खेळणार का नाही तेही झालं स्पष्ट
IND vs ENG : रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट आला, T20 खेळणार का नाही तेही झालं स्पष्ट
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) आल्यामुळे इंग्लंड दौऱ्यातली (India vs England) पाचवी टेस्ट खेळू शकला नाही.
बर्मिंघम, 3 जुलै : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) आल्यामुळे इंग्लंड दौऱ्यातली (India vs England) पाचवी टेस्ट खेळू शकला नाही. कोरोना झाल्यामुळे रोहित इंग्लंडविरुद्धची टी-20 आणि वनडे सीरिज खेळेल का नाही, याबाबतही साशंकता होती. 7 जुलैपासून टी-20 सीरिजला सुरूवात होणार आहे. या सीरिजआधी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे आता तो आयसोलेशनमधून बाहेर आला आहे. लिस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहितला कोरोनाचं संक्रमण झाल्याचं स्पष्ट झालं, यानंतर रोहित क्वारंटाईन झाला.
रोहित शर्माची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, मेडिकल प्रोटोकॉलनुसार आता तो आयसोलेशनमधून बाहेर आला आहे. आज नॉर्थम्पटनशायरविरुद्धच्या टी-20 सराव सामन्यात रोहित खेळणार नाही, कारण सुरूवातीच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांआधी त्याला आरामाची गरज आहे, असं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
मेडिकल प्रोटोकॉलनुसार कोरोना आयसोलेशनमधून बाहेर आल्यानंतर खेळाडूच्या फुफुस्सांची क्षमता बघितली जाते, यासाठी त्यांना काही अनिवार्य टेस्ट करून घ्याव्या लागतात. रोहित शर्मा मार्च महिन्यात श्रीलंकेविरुद्ध शेवटची टेस्ट मॅच खेळला होता.
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मॅचआधी रोहितची कोरोना टेस्ट तीन वेळा पॉझिटिव्ह आली होती, त्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. रोहितच्याऐवजी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडिया ही मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.