IND vs ENG : ऋषभ पंतचा फोटो BCCI ने शेयर केला, पण मास्कमुळे ट्रोल

टीम इंडियाचा युवा विकेट कीपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) कोरोना व्हायरसला (Corona Virus) हरवून पुन्हा एकदा फिट झाला आहे. त्याचा एक फोटो बीसीसीआयने (BCCI) शेयर केला.

टीम इंडियाचा युवा विकेट कीपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) कोरोना व्हायरसला (Corona Virus) हरवून पुन्हा एकदा फिट झाला आहे. त्याचा एक फोटो बीसीसीआयने (BCCI) शेयर केला.

  • Share this:
    लंडन, 22 जुलै : टीम इंडियाचा युवा विकेट कीपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) कोरोना व्हायरसला (Corona Virus) हरवून पुन्हा एकदा फिट झाला आहे. त्याचा एक फोटो बीसीसीआयने (BCCI) शेयर केला. या फोटोमध्ये ऋषभ पंतने मास्क (Mask) घातला आहे, तसंत तो थम्प्स अपचा इशाराही करत आहे. बीसीसीआयने शेयर केलेल्या या फोटोनंतर ऋषभ पंतला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. ऋषभ पंतची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तो इंग्लंडमध्ये त्याच्या नातेवाईकाच्या घरात आयसोलेशनमध्ये होता. आता पूर्णपणे फिट झाल्यावर आणि कोरोना टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता तो डरहममध्ये इतर खेळाडूंसोबत बायो-बबलमध्ये राहिल. ऋषभ पंत, तुझ्या पुनरागमनामुळे चांगलं वाटत आहे, असं कॅप्शन बीसीसीआयने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये पंतच्या मास्कवर एक कार्टून जीभ बाहेर काढलेलं दिसत आहे. या मास्कवरून पंतला ट्रोल करण्यात येत आहे. ऋषभ पंत युरो कपचा सामना बघण्यासाठी गेला होता, त्यावेळी त्याने मास्क न लावताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यावरूनही त्याच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. आधीच मास्क लावला असता, तर ही वेळ आली नसती, अशा प्रतिक्रिया काही जणांनी दिल्या आहेत. pant trolled कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पंत पहिल्या सराव सामन्यात खेळू शकला नाही. आता दुसऱ्या सराव सामन्यासाठी तो उपलब्ध आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजची सुरुवात 4 ऑगस्टपासून होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published: