• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • BREAKING : रवी शास्त्रींना कोरोनाची लागण, टीम इंडियाचे 3 सदस्य आयसोलेशनमध्ये

BREAKING : रवी शास्त्रींना कोरोनाची लागण, टीम इंडियाचे 3 सदस्य आयसोलेशनमध्ये

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India tour of England) मोठा धक्का बसला आहे. भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri Corona Positive) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

 • Share this:
  लंडन, 5 सप्टेंबर : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India tour of England) मोठा धक्का बसला आहे. भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri Corona Positive) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. शनिवारी संध्याकाळी रवी शास्त्रींना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं, यानंतर ते आयसोलेशनमध्ये गेले आहेत. याशिवाय शास्त्रींच्या संपर्कात आलेले बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun), फिल्डिंग कोच आर.श्रीधर (R Sridhar) आणि फिजियोथेरपिस्ट नितीन पटेल (Nitin Patel) देखील आयसोलेशनमध्ये गेले आहेत. रवी शास्त्री वगळता टीम इंडियाच्या इतर सर्व सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. टीमच्या इतर सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या मॅचला सुरुवात झाली आहे. रवी शास्त्री यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तरी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. फ्लो टेस्ट केल्यानतंर रवी शास्त्रींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अजून आरटी-पीसीआर टेस्टचे रिपोर्ट आलेले नाहीत. जोपर्यंत आरटी-पीसीआर टेस्टचे रिपोर्ट येत नाहीत, तोपर्यंत हे चौघं हॉटेलमध्येच क्वारंटाईन राहणार आहेत. तसंच त्यांना टीम इंडियासोबत प्रवास करण्याची परवानगी मिळणार नाही.
  Published by:Shreyas
  First published: