• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IND vs ENG : पृथ्वी-सूर्याचा कोरोना रिपोर्ट आला, इंग्लंडला जाणार का नाही? जाणून घ्या

IND vs ENG : पृथ्वी-सूर्याचा कोरोना रिपोर्ट आला, इंग्लंडला जाणार का नाही? जाणून घ्या

भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यात 4 ऑगस्टपासून 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होत आहे. या सीरिजआधी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आली आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

  • Share this:
    कोलंबो, 2 ऑगस्ट : भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यात 4 ऑगस्टपासून 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होत आहे. या सीरिजआधी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आली आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे पुढच्या 24 तासांमध्ये ते इंग्लंडला जाण्यासाठी रवाना होतील. इंग्लंडला जाण्याआधी या दोघांच्या लागोपाठ 3 कोरोना टेस्ट निगेटिव्ह येणं बंधनकारक होतं. या तिन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांना दुखापत झाल्यामुळे या दोघांची इंग्लंड दौऱ्यासाठी बदली खेळाडू म्हणून निवड झाली. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टीममध्ये असलेल्या पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना मागच्या आठवड्यात इंग्लंडला रवाना व्हायचं होतं, पण टी-20 सीरिजदरम्यान कृणाल पांड्याची (Krunal Pandya) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. पृथ्वी आणि सूर्यकुमार यादव कृणालच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना आयसोलेशनमध्ये जावं लागलं. तसंच त्यांना अखेरच्या दोन टेस्टही खेळता आल्या नाहीत आणि इंग्लंडमध्ये जाण्यासाठीही उशीर झाला. डेक्कन क्रॉनिकलला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही खेळाडू व्हिजासाठी थांबले आहेत. श्रीलंकेतलं इंग्लंडचं दूतावास शनिवार-रविवार बंद असल्यामुळे त्यांच्या व्हिजाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. 24 तासांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण व्हायची शक्यता आहे, यानंतरच ते इंग्लडला रवाना होऊ शकतात. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे इंग्लंडने भारत आणि श्रीलंकेतून येणाऱ्यांवर बंदी घातली आहे. पण बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डासोबत चर्चा केली, यानंतर या दोन्ही खेळाडूंना विशेष सवलत देण्यात आली. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर दोन्ही खेळाडूंना कमीत कमी 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. यानंतरच ते टेस्ट खेळण्यासाठी उपलब्ध असतील. या कारणामुळे नॉटिंघममधल्या पहिल्या टेस्टला दोन्ही खेळाडू मुकणार आहेत. सूर्यकुमार यादवने अजून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं नाही. याचवर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधली त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. 77 सामन्यांमध्ये 44 पेक्षा जास्तच्या सरासरीने त्याने 5,326 रन केले, यात 14 शतकांचा समावेश आहे. दुसरीकडे शॉने 5 टेस्टमध्ये 42 च्या सरासरीने 339 रन केले. शॉने पदार्पणाच्या आपल्या टेस्टमध्येच शतक केलं होतं. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एडलेड टेस्टमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर शॉला टीमबाहेर करण्यात आलं, पण विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने धमाकेदार कामगिरी केली. 8 सामन्यांमध्ये 165 च्या सरासरीने त्याने 827 रन ठोकले, यामध्ये 4 शतकं होती.
    Published by:Shreyas
    First published: