Home /News /sport /

IND Vs ENG: Pink Ball test मध्ये राडा; शुभमन गिलला नॉट आउट दिल्यावरून भडकले इंग्रजी खेळाडू

IND Vs ENG: Pink Ball test मध्ये राडा; शुभमन गिलला नॉट आउट दिल्यावरून भडकले इंग्रजी खेळाडू

इंग्लंडची खेळी 112 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताचे फलंदाज खेळायला आले आणि त्यानंतर लगेचच हा राडा झाला. दुसऱ्याच ओव्हरला शुभमन गिल नॉटआउट असल्यावरून वादावादी झाली. नेमकं काय घडलं?

    अहमदाबाद, 24 फेब्रुवारी :  भारत आणि इंग्लंडमध्ये  बुधवारपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी (IND Vs ENG test) सामन्यात पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी अंपायरच्या एका निर्णयावर उघड नाराजी दाखवली. अहमदाबादच्या नव्या कोऱ्या मोटेरा म्हणजे आता नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही पहिलीच कसोटी (Pink Ball test) सुरू आहे. शुभमान गिलला नॉट आउट दिल्यावर या सामन्यात जबरदस्त वादावादी झाली. शुभमन गिलचा कॅच इंग्लंडची खेळी 112 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताचे फलंदाज खेळायला आले आणि त्यानंतर लगेचच हा राडा झाला. भारताच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्याच ओव्हरला मैदानावर गिल नॉटआउट असल्यावरून वादावादी झाली. त्याआधी अक्षर पटेल (Axar Patel) आणि अश्विन (R.Ashwin) च्या फिरकीने तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या बॅटिंगची (India vs England) दाणादाण उडाली. अक्षर पटेलच्या घातक माऱ्यापुढे इंग्लिश खेळाडूंनी नांग्या टाकल्या आणि त्यांची खेळी 112 धावांवर संपली. भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल खेळायला उतरले. भारतीय डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या बॉलवर गिलच्या बॅटची किनार लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या बेन स्टोक्सकडे बॉल गेला. स्टोक्सने कॅच घेतल्याचा दावा केला, पण मैदानावरचे अंपायर अनिल चौधरी यांनी गिल आऊट असल्याचा संकेत देत तिसऱ्या अंपायरवर निर्णय सोपवला. थर्ड अंपायर शम्सुद्दीन यांनी केवळ दोन वेला रिप्ले पाहून शुभमन गिल नॉट आउट असल्याचं जाहीर केलं. बेन स्टोक्ससहित इंग्लंडच्या इतर खेळाडूंना या निर्णयाचा धक्का बसल्याचं जाणवलं. त्यांनी मैदानावरच याबाबत जाहीर नाराजी दाखवून दिली. बेन स्टोक्सने तर टाळ्या वाजवून निर्णयाची खिल्ली उडवली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटसह अन्य खेळाडू अंपायरबरोबर हुज्जत घालू लागले. इंग्लंडचे खेळाडू या नॉटआउटच्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेले दिसले. ग्राउंड अंपायरने गिल आउट असल्याचे संकेत दिल्यानंतर टीव्ही अंपायर निर्णय कसा काय बदलू शकतो, असा इंग्लिश खेळाडूंचा दावा होता. वाचा - जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर विराटनं वापरलं ट्रम्पकार्ड, इंग्लंड थक्क त्यातच कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या दिग्गज खेळाडूंनीही थर्ड अंपायरने आणखी काही वेळा रिप्ले बघायला हवा होता, असं मत व्यक्त केलं. खरं तर सुनील गावस्कर यांनी रिप्ले बघून लगेच सांगितलं होतं की, शुभमन नॉट आउट आहे यात शंका नाही. त्यांनी अंपायरचा निर्णय योग्य असल्याचंच सांगितलं. अहमदाबाद टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा फक्त 112 रनवर ऑल आऊट झाला. भारताकडून अक्षर पटेलने 6, अश्विनने 3 तर आपली 100 वी टेस्ट खेळणाऱ्या इशांत शर्माने एक विकेट घेतली. इंग्लंडकडून झॅक क्रॉलेने सर्वाधिक 53 रनची खेळी केली.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Ben stokes, IND Vs ENG

    पुढील बातम्या