• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : नॉटिंघम टेस्टच्या पिचचा पहिला PHOTO, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!

IND vs ENG : नॉटिंघम टेस्टच्या पिचचा पहिला PHOTO, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात बुधवार 4 ऑगस्टपासून 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. पहिली टेस्ट नॉटिंघमच्या ट्रेन्टब्रीज मैदानात होणार आहे. या मुकाबल्याआधी खेळपट्टीचा फोटो समोर आला आहे, ज्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढू शकतं.

 • Share this:
  नॉटिंघम, 2 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात बुधवार 4 ऑगस्टपासून 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. पहिली टेस्ट नॉटिंघमच्या ट्रेन्टब्रीज मैदानात होणार आहे. या मुकाबल्याआधी खेळपट्टीचा फोटो समोर आला आहे, ज्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढू शकतं. बीसीसीआयने (BCCI) नॉटिंघमच्या या खेळपट्टीचा फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये खेळपट्टीवर भरपूर गवत दिसत आहे. जर या खेळपट्टीवर मॅच खेळवली गेली, तर टीम इंडियाच्या बॅट्समनना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इंग्लंडमधलं वातावरण फास्ट बॉलरना अनुकूल असतं. तिकडे बॉलरना सीम आणि स्विंग मिळतो, त्यामुळे जर खेळपट्टीवर गवत असेल, तर फास्ट बॉलर आणखी धोकादायक ठरतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनलही (WTC Final) इंग्लंडमध्येच खेळवली गेली. या सामन्यात न्यूझीलंडच्या स्विंग बॉलर्सनी भारतीय बॅट्समनना त्रास दिला, ज्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावालागला. या सामन्यानंतर भारतीय टीमला 20 दिवसांचा ब्रेक मिळाला होता, यानंतर टीमने काऊंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्ध 20-22 जुलैदरम्यान एक सराव सामना खेळला तो ड्रॉ राहिला. सराव सामन्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दुखापतीमुळे खेळले नव्हते. मॅचमध्ये केएल राहुलने (KL Rahul) शतक आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 75 रन केले. तर उमेश यादवने (Umesh Yadav) विकेट घेतल्या. नॉटिंघमची खेळपट्टी नेहमीच फास्ट बॉलरना मदत करते. इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसन (James Anderson) याने या मैदानात 10 टेस्टमध्ये 19.62 च्या सरासरीने 64 विकेट घेतल्या आहेत. नॉटिंघममध्ये त्याला 7 वेळा 5 आणि 2 वेळा 10 विकेट मिळाल्या. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) या मैदानात सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा खेळाडू आहे. 6 टेस्टमध्ये त्याने 20.21 च्या सरासरीने 41 विकेट घेतल्या. भारताकडून इशांत शर्माने (Ishant Sharma) या मैदानात 3 टेस्टमध्ये 12 विकेट मिळवल्या. भारताचा 2018 सालच्या इंग्लंड दौऱ्यात 1-4 ने पराभव झाला होता. या सीरिजमधली एकमेव मॅच टीमने नॉटिंघममध्ये जिंकली होती. त्यावेळी भारताने इंग्लंडचा 203 रनने पराभव केला होता. या सामन्यात विराटने पहिल्या इनिंगमध्ये 97 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 103 रनची खेळी केली होती. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी मॅचमध्ये 5-5 विकेट घेतल्या होत्या. 2014 सालीही भारताने ट्रेन्ट ब्रीजमध्ये टेस्ट खेळली होती, ही टेस्ट ड्रॉ झाली होती.
  Published by:Shreyas
  First published: