लंडन, 29 जून : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाची सगळ्यात मोठी कसोटी ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा न्यूझीलंडने पराभव केला, यानंतर विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या पर्वाची टीम इंडियाची ही पहिलीच सीरिज आहे, त्यामुळे विराट आणि टीम याची चांगली सुरुवात करण्यासाठी आग्रही असतील. भारताचं इंग्लंडमधलं रेकॉर्ड मात्र खराब आहे.
कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये सर्वाधिक पराभव एमएस धोनीचे (MS Dhoni) झाले आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडमध्ये 9 टेस्ट खेळल्या, यातल्या फक्त एका टेस्टमध्ये भारताचा विजय झाला तर 7 पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला. विराटच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडमध्ये 6 टेस्ट खेळल्या, यात भारताला 5 पराभव स्वीकारावे लागले आणि एक सामना जिंकता आला. या दौऱ्यात विराटला हे रेकॉर्ड सुधारण्याची संधी आहे.
इंग्लंडच्या टीमचं घरच्या मैदानातलं प्रदर्शन उत्कृष्ट असलं तरी काहीच दिवसांपूर्वी न्यूझीलंडने त्यांचा टेस्ट सीरिजमध्ये 1-0 ने पराभव केला.
द्रविड-कपिल देव हरले नाहीत
इंग्लंडमध्ये भारताकडून 16 खेळाडूंनी नेतृत्व केलं, यातल्या कपिल देव (Kapil Dev) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना एकाही टेस्टमध्ये पराभवाचा सामना करावा लागला नाही. उरलेल्या 14 कर्णधारांना कमीत कमी एक टेस्टमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. कपिल देव कर्णधार असताना भारताने इंग्लंडमध्ये 3 पैकी 2 टेस्ट जिंकल्या आणि एक टेस्ट ड्रॉ झाली. तर भारताचे 10 कर्णधार इंग्लंडमध्ये एकही सामना जिंकू शकले नाहीत. इंग्लंडमध्ये सर्वाधिक 2 विजय कपिल देव यांना मिळाले आहेत.
टीम इंडियाने इंग्लंडमध्ये 63 सामने खेळले, यातल्या 35 मॅचमध्ये भारताचा पराभव झाला, तर फक्त 7 मॅच टीमला जिंकता आल्या आणि 21 मॅच ड्रॉ झाल्या. कोहलीच्य नेतृत्वात मागच्या दौऱ्यात 2018 साली भारताचा 4-1 ने पराभव झाला होता. राहुल द्रविड कर्णधार असताना भारताने इंग्लंडमध्ये 2007 साली अखेरची सीरिज जिंकली होती. म्हणजेच टीम इंडियाला मागच्या 14 वर्षांत इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, MS Dhoni, Rahul dravid, Team india, Virat kohli