• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : भारताच्या या खेळाडूची इंग्लंडला भीती, सीरिजमध्ये ठरणार एक्स फॅक्टर!

IND vs ENG : भारताच्या या खेळाडूची इंग्लंडला भीती, सीरिजमध्ये ठरणार एक्स फॅक्टर!

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजआधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसार (Monty Panesar) याने मोठी भविष्यवाणी केली आहे.

 • Share this:
  लंडन, 2 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजआधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसार (Monty Panesar) याने मोठी भविष्यवाणी केली आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाचा विजय होईल, असं मॉन्टी म्हणाला आहे, तसंच या सीरिजमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) टीम इंडियाचा हिरो ठरेल, त्याच्याकडे एवढं टॅलेंट असल्यामुळे तोच एक्स फॅक्टर ठरेल, असंही पनेसारला वाटतंय. इनसाईड स्पोर्टसोबत बोलताना मॉन्टी पनेसार म्हणाला, 'भारताकडे टेस्ट सीरिज जिंकण्याची चांगली संधी आहे. भारतीय टीम मजबूत दिसत आहे. इंग्लंडची टीम स्पिनर्सविरुद्ध कशी खेळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. विराट कोहली (Virat Kohli) स्पिनर्सना संधी देईल आणि ही सीरिज जिंकेल.' 'ऋषभ पंत टेस्ट सीरिजचा स्टार असेल. भारत चांगल्या स्थितीमध्ये असेल तर तो खेळ इंग्लंडपासून लांब घेऊन जाईल. परिस्थिती कठीण असेल, तरीही तो त्याचा नैसर्गिक आक्रमक खेळ करेल. सगळ्यांचं लक्ष पंतवर लागलं आहे,' अशी प्रतिक्रिया मॉन्टी पनेसारने दिली. 'भारताला या सीरिजसाठी तयारी करायला चांगली संधी मिळाली, त्यामुळे ते सीरिज जिंकू शकतात. जास्त उंचीचे बॉलर भारताच्या बॅट्समनना त्रास देऊ शकतात. ओली रॉबिनसनची उंची जास्त आहे, त्यामुळे तो भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंडमध्ये चांगली बॉलिंग करतातच,' असं वक्तव्य पनेसारने केलं.
  Published by:Shreyas
  First published: