मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : मोहम्मद सिराजचा भेदक बाऊन्सरचा शिकार झाला वॉशिंग्टन सुंदर, VIDEO

IND vs ENG : मोहम्मद सिराजचा भेदक बाऊन्सरचा शिकार झाला वॉशिंग्टन सुंदर, VIDEO

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडिया (India vs England) डरहममध्ये सराव सामना खेळत आहे. सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फास्ट बॉलर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) भेदक बाऊन्सरने आपलाच साथी वॉशिंग्टन सुंदरची (Washington Sundar) विकेट घेतली.

पुढे वाचा ...

लंडन, 21 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडिया (India vs England) डरहममध्ये सराव सामना खेळत आहे. काऊंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा 311 रनवर ऑल आऊट झाला, यात केएल राहुलने (KL Rahul) शानदार 101 रनची खेळी केली. सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय बॉलर्सनी उत्कृष्ट बॉलिंग केली. फास्ट बॉलर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) टाकलेला बॉल चर्चेत आला आहे. सिराजने भेदक बाऊन्सरने आपलाच साथी वॉशिंग्टन सुंदरची (Washington Sundar) विकेट घेतली. सुंदर या मॅचमध्ये काऊंटी सिलेक्ट इलेव्हन टीमकडून खेळत आहे.

चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला मोहम्मद सिराजने फार काळ क्रीजवर टिकून दिलं नाही. मोहम्मद सिराजने आपल्या जबरदस्त बाऊन्सरने सुंदरला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. सिराजचा बाऊन्सर इतका अचूक होता की सुंदरला काहीच करण्याची संधी मिळाली नाही आणि बॅटची कडा घेऊन बॉल स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात गेला.

सराव सामन्यात उमेश यादव (Umesh Yadav) आणि खराब फॉर्ममध्ये असलेल्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी चांगली बॉलिंग केली. उमेश यादवने दोन्ही विकेट बोल्ड घेतल्या. तर बुमराहने रॉबर्ट येट्सला विकेटकीपर केएल राहुलकडे कॅच केलं.

भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी इंग्लंडने टीमची घोषणा केली आहे. पहिल्या दोन टेस्टसाठीची ही टीम आहे. 4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. जोफ्रा आर्चरला फिट नसल्यामुळे टीममध्ये स्थान देण्यात आलं नाही, तर सोशल मीडियावरच्या वादानंतर निलंबित केलेल्या ओली रॉबिनसनचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

इंग्लंडची टीम

जो रूट (कर्णधार), जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॉस बटलर, जॅक क्रॉले, सॅम करेन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिनसन, डॉम सिब्ले, बेन स्टोक्स, मार्क वूड

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs england