Home /News /sport /

IND vs ENG : पहिल्या 3 टेस्टमध्ये होणार भरपूर रन, भारताच्या माजी कर्णधाराने सांगितलं कारण

IND vs ENG : पहिल्या 3 टेस्टमध्ये होणार भरपूर रन, भारताच्या माजी कर्णधाराने सांगितलं कारण

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला (Test Series) 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. चाहत्यांसोबतच क्रिकेटपटूही या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

    मुंबई, 31 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. चाहत्यांसोबतच क्रिकेटपटूही या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय बॅट्समनना आधीपासूनच इंग्लंडमध्ये संघर्ष करावा लागला आहे. मागच्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही (WTC Final) टीम इंडियाच्या बॅट्समननी निराशा केली. भारताच्या कोणत्याही बॅट्समनना या मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक करता आलं नाही. हेच टीम इंडियाच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही वातावरण फास्ट बॉलिंगला अनुकूल असण्याची शक्यता आहे, पण भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) याने केलेल्या भविष्यवाणीमुळे भारतीय बॅट्समन खूश होतील. अझरुद्दीनने भारत-इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजबाबत ट्वीट केलं आहे. ऑगस्ट महिना इंग्लंडमध्ये रन करण्यासाठी उत्तम आहे. माझ्या अनुभवानुसार खेळपट्टी कोरडी असते आणि बॅट्समनसाठी हा महिना अनुकूल असतो. बॅट्समननी याचा फायदा करून घेतला पाहिजे, असं अझर म्हणाला. अझरुद्दीनच्या या दाव्यानुसार पहिल्या तीन टेस्टमध्ये भरपूर रन येऊ शकतात. भारत-इंग्लंड यांच्यातली टेस्ट सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सीरिजचा दुसरा सामना 12 ऑगस्टला लॉर्ड्सवर होणार आहे. तिसरी टेस्ट हेडिंग्लीमध्ये 25 ऑगस्टपासून सुरू होईल. तर चौथी टेस्ट 2 सप्टेंबरपासून ओव्हलमध्ये आणि अखेरची टेस्ट 10 सप्टेंबरला मॅनचेस्टरमध्ये खेळवली जाईल. भारत-इंग्लंड यांच्यातल्या 3 टेस्ट ऑगस्ट महिन्यात होणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये सर्वाधिक अपेक्षा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्याकडून आहेत, कारण दोन्ही देशांमध्ये 2018 साली इंग्लंडमध्ये झालेल्या टेस्ट सीरिजदरम्यान या तिघांनी रन केले होते. विराट त्या सीरिजमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला. त्या दौऱ्यावेळीही सीरिजच्या 5 पैकी 4 टेस्ट ऑगस्ट महिन्यात झाल्या होत्या. मागच्या इंग्लंड दौऱ्यात विराटने 5 टेस्टमध्ये 59.30 च्या सरासरीने 593 रन केले, यात 2 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तर चेतेश्वर पुजाराने 4 टेस्टमध्ये 278 रन केले. त्याने एक शतक आणि एक अर्धशतक केलं होतं. रहाणेनेही इंग्लंड दौऱ्यात दोन अर्धशतकं केली होती. मागच्या इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा टेस्ट टीममध्ये नव्हता. यावेळी त्याच्याकडून सुरुवातीलाच रन करण्याची अपेक्षा असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs england

    पुढील बातम्या