• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : पहिल्या टेस्ट आधी टीम इंडियाला मोठा धक्का, आणखी एक खेळाडू बाहेर

IND vs ENG : पहिल्या टेस्ट आधी टीम इंडियाला मोठा धक्का, आणखी एक खेळाडू बाहेर

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे, पण पहिल्या टेस्ट आधीच टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे तो पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला आहे.

 • Share this:
  लंडन, 2 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे, पण पहिल्या टेस्ट आधीच टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे तो पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. सराव करत असताना मोहम्मद सिराजचा बाऊन्सर त्याच्या डोक्याला लागला. मयंक अग्रवाल बाहेर झाल्यामुळे आता टीम इंडियापुढे ओपनिंगला कोणाला खेळवायंच हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि आवेश खान (Avesh Khan) हे तीन खेळाडू आधीच टेस्ट सीरिजमधून दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. त्यानंतर शुभमन गिलऐवजी मयंक अग्रवाल ओपनिंगला खेळेल, असं सांगितलं जात होतं. आता मयंक अग्रवालही बाहेर झाल्यामुळे केएल राहुल (KL Rahul) रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंगला खेळेल, हे जवळपास निश्चित आहे. केएल राहुलने सराव सामन्यामध्ये शतक केलं होतं, त्यामुळे तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सूर्या-पृथ्वी कधी पोहोचणार? दुसरीकडे श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्या कोरोनाच्या तिन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत, त्यामुळे त्यांचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढच्या 24 तासांमध्ये हे दोघं इंग्लंडसाठी रवाना होतील, अशी माहिती आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतरही या दोघांना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे, यानंतरच ते टीममध्ये प्रवेश करू शकतील. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या टेस्टपासून उपलब्ध होतील.
  Published by:Shreyas
  First published: