लंडन, 19 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England Lords Test) ऐतिहासिक विजय झाला. मॅचच्या चौथ्या दिवशी भारतीय टीम या सामन्यात संघर्ष करत होती, पण मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी अखेरच्या दिवशी 89 रनची नाबाद पार्टनरशीप करत इंग्लंडला 272 रनचं आव्हान दिलं. ही मॅच वाचवण्यासाठी इंग्लंडला 60 ओव्हर बॅटिंग करायची होती, पण 120 रनवर आणि 9 ओव्हर शिल्लक असताना भारताने इंग्लंडचा ऑल आऊट केला.
भारताने ठेवलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला पहिल्यापासूनच धक्के बसले. शून्य रनवरच त्यांचे दोन्ही ओपनर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर भारतीय बॉलर्सच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. जेम्स अंडरसन (James Anderson) याची अखेरची विकेट घेतल्यानंतर टीम इंडियाने एकच जल्लोष केला, पण या जल्लोषामध्येच रोहित शर्माने (Rohit Sharma) पकडलेला कॅच कोणाच्याच लक्षात आला नाही. रोहितने पकडलेल्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोहम्मद सिराजने जेम्स अंडरसनला बोल्ड केलं. मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) टाकलेला बॉल ऑफ स्टम्पला लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या दिशेने गेला. यानंतर रोहितने उडी मारून एका हातात बॉल पकडला. रोहितच्या कॅचचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमधली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली तर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला, त्यामुळे या सीरिजमध्ये भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता सीरिजची तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Rohit sharma