मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : लॉर्ड्स टेस्टमध्ये भारतीय खेळाडूंनी अडवली होती इंग्लंडच्या बॅट्समची वाट

IND vs ENG : लॉर्ड्स टेस्टमध्ये भारतीय खेळाडूंनी अडवली होती इंग्लंडच्या बॅट्समची वाट

लॉर्ड्स टेस्टवर समोर न आलेला वाद

लॉर्ड्स टेस्टवर समोर न आलेला वाद

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात लॉर्ड्सवर (Lords Test) झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये अनेक वाद पाहायला मिळाले. दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये बाचाबाचीही झाली. यातच आता भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या इनिंगदरम्यान इंग्लंडचा बॅट्समन ओली रॉबिनसनचा (Ollie Robinson) रस्ता अडवल्याचं वृत्त समोर आलं आहे.

पुढे वाचा ...

लंडन, 19 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात लॉर्ड्सवर (Lords Test) झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये अनेक वाद पाहायला मिळाले. दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये बाचाबाचीही झाली. यातच आता भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या इनिंगदरम्यान इंग्लंडचा बॅट्समन ओली रॉबिनसनचा (Ollie Robinson) रस्ता अडवल्याचं वृत्त समोर आलं आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवत 5 टेस्टच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. आता सीरिजची तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून हेडिंग्लीमध्ये होणार आहे.

गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार ओली रॉबिनसन लॉर्ड्सच्या पायऱ्यांवरून उतरत होता, तेव्हा त्याच्यासमोर भारतीय खेळाडू आले. मैदानात ड्रिंक्स देऊन भारतीय खेळाडू परत ड्रेसिंग रूममध्ये येत होते. रॉबिनसन भारतीय खेळाडू बाजूला व्हायची वाट पाहत होता. अखेर रॉबिनसन भारतीय खेळाडूंना चिकटून मैदानात गेला.

तिसऱ्या दिवसापासून वाद सुरू

मॅचच्या तिसऱ्या दिवसापासून भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या वादाला सुरुवात झाली होती. बुमराहने (Jasprit Bumrah) अंडरसनला (James Anderson) बाऊन्सर टाकले होते, यानंतर अंडरसन बुमराहला उद्देशून काहीतरी बोलला, यानंतर चौथ्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) आणि जेम्स अंडरसन यांच्यातही वाद झाला. पाचव्या दिवशी बुमराह जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा इंग्लंडच्या खेळाडूंनी बुमराहचं स्लेजिंग करायला सुरुवात केली.

7 वर्षानंतर भारताचा विजय

टीम इंडियाचा लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात 151 रनने विजय झाला. याआधी 2014 साली भारताचा लॉर्ड्सवर विजय झाला होता. लॉर्ड्सवरचा हा भारताचा तिसरा विजय होता. 8 विकेट गमावल्यानंतर टीम इंडिया या मॅचमध्ये संघर्ष करत होती, पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या 89 रनच्या पार्टनरशीपमुळे भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला. शमी (Mohammad Shami) आणि बुमराहने त्यांच्या करियरमधला सर्वाधिक स्कोअरही केला. भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजने या मॅचमध्ये 8 विकेट घेतल्या.

First published:

Tags: India vs england