मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : इंग्लिश फॅन्सनी राहुलवर फेकली दारूच्या बॉटलची झाकणं, विराटची रिएक्शन पाहून शॉक, VIDEO

IND vs ENG : इंग्लिश फॅन्सनी राहुलवर फेकली दारूच्या बॉटलची झाकणं, विराटची रिएक्शन पाहून शॉक, VIDEO

क्रिकेटच्या पंढरीत इंग्लिश फॅन्सचा निर्लज्जपणा

क्रिकेटच्या पंढरीत इंग्लिश फॅन्सचा निर्लज्जपणा

क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर (Lords Cricket Ground) लाजिरवाणी घटना घडली आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या क्रिकेट चाहत्यांनी केएल राहुलवर (KL Rahul) बियर आणि शॅम्पेन बॉटलची झाकणं फेकली.

पुढे वाचा ...

लंडन, 14 ऑगस्ट : क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर (Lords Cricket Ground) लाजिरवाणी घटना घडली आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या क्रिकेट चाहत्यांनी केएल राहुलवर (KL Rahul) बियर आणि शॅम्पेन बॉटलची झाकणं फेकली. या टेस्टमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाचा ओपनर केएल राहुलने शानदार शतक केलं. राहुलच्या 129 रनच्या खेळीमुळे भारताने पहिल्या इनिंगमध्ये 364 रन केले. मॅचच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया फिल्डिंग करत होती, तेव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या काही प्रेक्षकांनी राहुलवर दारूच्या बॉटलची झाकणं फेकली.

केएल राहुल जेव्हा बाऊंड्री लाईनवर उभा होता तेव्हा प्रेक्षकांनी हे लाजिरवाणं कृत्य केलं. सोशल मीडियावर इंग्लंडच्या प्रेक्षकांच्या या निर्लज्जपणाचा व्हिडिओ शेयर केला जात आहे. 68 व्या ओव्हरदरम्यान ही घटना घडली. इंग्लिश चाहत्यांचं हे कृत्य पाहून केएल राहुल आणि विराट कोहली (Virat Kohli) चांगलेच भडकले. विराटने तर राहुलला ही झाकणं पुन्हा प्रेक्षकांच्या दिशेने फेकायला सांगितली.

सोशल मीडियावर इंग्लंडच्या प्रेक्षकांच्या या कृत्यावर जोरदार टीका होत आहे. मैदानात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ खेळही थांबवण्यात आला होता. यावेळी विराटने राहुलला ही झाकणं पुन्हा स्टॅण्डमध्ये फेकण्याचा इशारा केला. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने या मॅचमध्ये पुन्हा एकदा शतक केलं. या सीरिजच्या तीन इनिंगमध्ये रूटने दोन शतकं आणि एक अर्धशतक केलं आहे. जो रूट याला जॉनी बेयरस्टोनेही चांगली साथ दिली. अर्धशतक करून बेयरस्टो आऊट झाला.

First published:

Tags: India vs england, Kl rahul, Virat kohli