मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : इंग्लंडमध्ये विराटच्या फेवरेट खेळाडूचं धडाकेबाज शतक, टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला

IND vs ENG : इंग्लंडमध्ये विराटच्या फेवरेट खेळाडूचं धडाकेबाज शतक, टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या पहिल्या टेस्टला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियाला दिलासादायक बातमी मिळाली आहे. टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी झगडणाऱ्या केएल राहुलने (KL Rahul) सराव सामन्यामध्ये धमाकेदार शतक केलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

डरहम, 20 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या पहिल्या टेस्टला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियाला दिलासादायक बातमी मिळाली आहे. टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी झगडणाऱ्या केएल राहुलने (KL Rahul) सराव सामन्यामध्ये धमाकेदार शतक केलं. त्याने 150 बॉलमध्ये 101 रन केले, यामध्ये 11 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता. शतक केल्यानंतर राहुल रिटायर्ड झाला. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला या सामन्यात संघर्ष करावा लागला असताना राहुलने शतकी खेळी केली. याशिवाय रविंद्र जडेजानेही (Ravindra Jadeja) अर्धशतक केलं.

पाठीच्या दुखापतीमुळे विराट कोहलीला (Virat Kohli) सराव सामन्यातून माघार घ्यायचा सल्ला देण्यात आला आहे, तर अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) हॅमस्ट्रिंगवर (गुडघ्याच्या मागच्या भागातील टिश्यू) वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. या कारणामुळे विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सिलेक्ट काऊंटी इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यासाठी मैदानात उतरले नाहीत.

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारतीय टीम डरहममध्ये सराव सामना खेळत आहे. काऊंटी सिलेक्ट इलेव्हनच्या (County Select XI) बॉलिंगसमोर रोहित शर्मा (Rohit Sharma), मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)लवकर आऊट झाले. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही टीम इंडियाचे बॅट्समन अपयशी ठरले होते.

विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्माकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. रोहितने सुरुवातीला सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण 9 रन करून तो आऊट झाला. मयंकला 28 रन, पुजाराला 21 रन आणि हनुमा विहारीला 24 रन करता आले.

दुखापतीमुळे शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाला आहे. त्यातच आता केएल राहुलला सूर सापडला आहे, त्यामुळे रोहित शर्मासोबत केएल राहुल ओपनिंगला येणार का मयंक अग्रवाल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इंग्लंड दौऱ्यात केएल राहुलचा उपयोग मधल्या फळीत करण्याचा विचार टीम इंडिया करत आहे. याच कारणासाठी गिलच्या दुखापतीनंतर टीमने निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांच्याकडे दोन ओपनरची मागणी केली होती. अध्यक्षांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे टीम आणि निवड समितीमध्ये वाद असल्याच्या चर्चा रंगल्या. इंग्लंडमध्ये ओपनर म्हणून टीम इंडियाच्या प्रशासनाला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdut Paddikal) हवे आहेत, असंही बोललं गेलं.

First published:

Tags: Cricket, India vs england, Kl rahul