Home /News /sport /

IND vs ENG : मैदानातला पंगा राहुलला पडला महागात, ICC ने केली कारवाई

IND vs ENG : मैदानातला पंगा राहुलला पडला महागात, ICC ने केली कारवाई

केएल राहुलवर आयसीसीने केली कारवाई

केएल राहुलवर आयसीसीने केली कारवाई

भारताचा ओपनिंग बॅट्समन केएल राहुलवर (KL Rahul) शनिवारी अंपायरच्या निर्णयावर आक्षेप घेतल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीने (ICC) केएल राहुलवर त्याच्या मॅच फीपैकी 15 टक्क्यांचा दंड लावला आहे.

    लंडन, 5 सप्टेंबर : भारताचा ओपनिंग बॅट्समन केएल राहुलवर (KL Rahul) शनिवारी अंपायरच्या निर्णयावर आक्षेप घेतल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीने (ICC) केएल राहुलवर त्याच्या मॅच फीपैकी 15 टक्क्यांचा दंड लावला आहे. शनिवारी भारताची बॅटिंग सुरू असताना 34 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलच्या ओपनिंग जोडीने 83 रनची पार्टनरशीप झाली होती. तेव्हा जेम्स अंडरसनने (James Anderson) ही जोडी तोडली. विकेट कीपर जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) राहुलचा कॅच पकडला, पण अंपायरने नॉट आऊट दिलं, यानंतर इंग्लंडने डीआरएस घेतला. थर्ड अंपायरने राहुलला आऊट दिल्यानंतर त्याने नाराजी व्यक्त केली. जेम्स अंडरसनने टाकलेला बॉल आऊट स्विंग झाला, या बॉलवर खेळण्याचा राहुलने प्रयत्न केला, पण यात त्याची चूक झाली. बॉल बॅटला लागला, तसंच राहुलची बॅट पॅडलाही लागली. अल्ट्रा एजमध्येही एकदा बॉल बॅटला लागल्याचं आणि एकदा बॅट पॅडला लागल्याचं दिसून आलं. थर्ड अंपायरने आऊट दिल्यानंतर मात्र राहुलला धक्का बसला आणि तो मान हलवत पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुल आयसीसीच्या नियम 2.8 नियमाचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अंपायरच्या निर्णयाशी असहमती दाखवण्याबाबतचा हा नियम आहे. मागच्या 24 महिन्यांमधला राहुलचा हा पहिलाच डिमेरीट पॉईंट आहे. राहुलने आपली चूक स्वीकारली त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी घेण्यात आली नाही. मैदानातले अंपायर रिचर्ड एलिंगवर्थ, एलेक्स वार्फ, थर्ड अंपायर मायकल गॉफ आणि चौथा अंपायर माईक बर्न्स यांनी राहुलवर आरोप निश्चित केले होते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Kl rahul

    पुढील बातम्या