Home /News /sport /

IND vs ENG : बुमराहचं 'शतक', हा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय!

IND vs ENG : बुमराहचं 'शतक', हा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय!

बुमराहने केला विक्रम

बुमराहने केला विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी (India vs England 4th Test) भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) विक्रमाला गवसणी घातली आहे.

    लंडन, 6 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी (India vs England 4th Test) भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) विक्रमाला गवसणी घातली आहे. ओली पोपला (Ollie Pope) बोल्ड करत बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये 100 विकेटचा पल्ला गाठला आहे. ओव्हल टेस्टच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्रात बुमराहने रिव्हर्स स्विंगच्या मदतीने इंग्लंडच्या बॅटिंगची अक्षरश: पिसं काढली. त्याने पहिले पोपला आणि मग जॉनी बेयरस्टोला (Jonny Bairstow) आपल्या रिव्हर्स स्विंगवर बोल्ड केलं. बुमराह टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा भारतीय फास्ट बॉलर ठरला आहे. आपल्या 24 व्या टेस्टमध्येच त्याला 100 वी विकेट मिळाली. याआधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी 25 टेस्टमध्ये 100 विकेट मिळवल्या. तर इरफान पठाणने 28, मोहम्मद शमीने 29, जवागल श्रीनाथने 30 आणि इशांत शर्माने 33 टेस्टमध्ये 100 विकेटचा टप्पा गाठला होता. जसप्रीत बुमराहच्या या भेदक स्पेलमुळे इंग्लंड या मॅचमधून पूर्णपणे बाहेर झालं. पहिल्या सत्रात दोन विकेट मिळवल्यानंतर भारताने दुसऱ्या सत्रात चार विकेट गमावल्या. बुमराहने दोन आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. ओव्हल टेस्टमध्ये विजय झाला तर टीम इंडिया 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेईल. सीरिजची पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला, तर तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडने पुनरागमन केलं. सीरिजची पाचवी टेस्ट 10 सप्टेंबरपासून मॅनचेस्टरमध्ये खेळवली जाणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Jasprit bumrah

    पुढील बातम्या