मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टेस्ट सीरिज आधीच इंग्लंडच्या खेळाडूने टीम इंडियाला दिली आनंदाची बातमी

IND vs ENG : टेस्ट सीरिज आधीच इंग्लंडच्या खेळाडूने टीम इंडियाला दिली आनंदाची बातमी

पावसामुळे पहिली टेस्ट ड्रॉ

पावसामुळे पहिली टेस्ट ड्रॉ

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे, त्याआधी इंग्लंडचा डावखुरा स्पिनर जॅक लिच (Jack Leach) याने टीम इंडियाला दिलासादायक बातमी दिली आहे.

  • Published by:  Shreyas

लंडन, 1 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे, त्याआधी इंग्लंडचा डावखुरा स्पिनर जॅक लिच (Jack Leach) याने टीम इंडियाला दिलासादायक बातमी दिली आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या सुकलेल्या आहेत, त्यामुळे स्पिन बॉलिंगला मदत होईल, असं लिच म्हणाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) पराभव केला होता, तेव्हा न्यूझीलंडच्या स्विंग बॉलिंगने टीम इंडियाला चांगलाच त्रास दिला होता. याआधी 2018 सालच्या इंग्लंड दौऱ्यात भारताचा 1-4 ने पराभव झाला होता.

जॅक लिचने फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंडच्या भारत दौऱ्यात 4 टेस्टमध्ये 18 विकेट घेतल्या होत्या. 'वर्षाच्या या काळात खेळपट्ट्या सुकलेल्या असतात, त्यामुळे स्पिनरची भूमिका महत्त्वाची असेल. भारतासारख्या मजबूत टीमविरुद्ध खेळताना आपला स्तर काय आहे, हे आम्हाला समजेल,' असं जॅक लिच द गार्डियनसोबत बोलताना म्हणाला.

IND vs ENG : पहिल्या 3 टेस्टमध्ये होणार भरपूर रन, भारताच्या माजी कर्णधाराने सांगितलं कारण

ऍशेस सीरिजमध्ये आपलं स्थान पक्कं करण्यासाठी जॅक लिच या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. भारतीय खेळाडूंविरुद्ध आपण चांगली कामगिरी करू, असा विश्वास जॅक लिचने व्यक्त केला आहे.

जॅक लिचने सांगितल्याप्रमाणे जर इंग्लंडच्या खेळपट्ट्या सुकलेल्या असतील, तर याचा फायदा भारताच्या बॅट्समनना रन काढण्यासाठी होऊ शकतो. तसंच भारताचे स्पिनरही यामुळे चांगली कामगिरी करू शकतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पुढच्या सत्रातली टीम इंडियाची ही पहिलीच सीरिज आहे, त्यामुळे चांगली सुरुवात करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

First published:

Tags: Cricket, India vs england