Home /News /sport /

IND vs ENG : टीम इंडियात मोठा वाद, निवड समिती अध्यक्ष या दोन खेळाडूंविरोधात!

IND vs ENG : टीम इंडियात मोठा वाद, निवड समिती अध्यक्ष या दोन खेळाडूंविरोधात!

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियातला (Team India) मोठा वाद आता समोर आला आहे. इंग्लंडमध्ये भारतीय टीम ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांना टीममध्ये ठेवण्यासाठी आग्रही होती, मग चेतन शर्मा (Chetan Sharma) यांचा याला विरोध होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 जुलै : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियातला (Team India) मोठा वाद आता समोर आला आहे. इंग्लंडमध्ये भारतीय टीम ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांना टीममध्ये ठेवण्यासाठी आग्रही होती, मग चेतन शर्मा (Chetan Sharma) यांचा याला विरोध होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढच नाही तर रणजी ट्रॉफी 2019-20 आणि न्यूझीलंड दौऱ्यात भारत ए कडून खराब कामगिरी केल्यानंतरही अभिमन्यू इश्वरनला (Abhimanyu Ishwaran) टीममध्ये स्टॅण्ड बाय खेळाडू म्हणून संधी कशी मिळाली? असंही विचारलं जाऊ लागलं आहे. बीसीसीआयच्या गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'शुभमन गिल (Shubhaman Gill) दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाला आहे. त्याला फिट व्हायला कमीत कमी तीन महिने लागतील. मागच्या महिन्यात टीम मॅनेजमेंटने इतर दोन बॅट्समनना इंग्लंडमध्ये पाठवायला सांगितलं होतं.' शुभमन गिलची दुखापत माहिती असूनही चेतन शर्मा यांनी टीम प्रशासनाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे आता पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांच्यासाठी टीम प्रशासन अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांना विनंती करणार का? असा प्रश्न आहे. जय शाह निवड समितीचे संयोजकही आहेत. 'पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाठवण्याबाबत बीसीसीआय (BCCI) अध्यक्षांना अजून अधिकृत विनंती करण्यात आलेली नाही. हे दोघं सध्या श्रीलंकेत आहेत आणि 26 जुलैला श्रीलंका सीरिज संपल्यानंतर ते इंग्लंडला जाऊ शकतात, पण टीमला त्याआधीच दोन्ही खेळाडू तिकडे हवे आहेत,' असा दावा बीसीसीआयच्या सूत्राने केला. चेतन शर्मा यांनी टीमच्या मागणीकडे आधीच लक्ष दिलं असतं, तर पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल सराव सामन्यासाठीच इंग्लंडला पोहोचले असते. 'टीमने अधिकृतरित्या कोणत्याही खेळाडूचं नाव घेतलेलं नाही. पृथ्वी सध्या श्रीलंकेत आहे, त्याचं लक्ष या सीरिजवर आहे. इंग्लंड दौऱ्यात 23 खेळाडू आहेत. जरी आपण इश्वरनला पकडलं नाही तरी टीमकडे तीन ओपनर आहेत,' अशी प्रतिक्रिया सूत्राने दिली. पृथ्वी शॉऐवजी अभिमन्यू इश्वरनची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यावरही एका माजी निवड समिती सदस्याने आक्षेप घेतला आहे. 'इश्वरन आणि पृथ्वी शॉची तुलनाच होऊ शकत नाही. टॅलेन्टच्या बाबतीत पृथ्वी इश्वरनच्या मैलांनी पुढे आहे. पृथ्वी शॉच्या नावावर टेस्टमध्ये शतक आहे आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याला श्रीलंकेत नाही तर इंग्लंडमध्ये असायला पाहिजे होतं,' असं वक्तव्य त्याने केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs england, Prithvi Shaw, Team india

    पुढील बातम्या