Home /News /sport /

रवी शास्त्रींना असा झाला कोरोना, टीम हॉटेलमधली Inside Story

रवी शास्त्रींना असा झाला कोरोना, टीम हॉटेलमधली Inside Story

रवी शास्त्रींना कोरोनाची लागण

रवी शास्त्रींना कोरोनाची लागण

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट टीमला मोठा धक्का बसला, जेव्हा टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली.

    लंडन, 6 सप्टेंबर : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट टीमला मोठा धक्का बसला, जेव्हा टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली. यानंतर आता आता टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) आणि आर.श्रीधर (R Sridhar) यांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. इंग्लंडमध्ये सुरक्षित वातावरणात असताना आणि कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले असताना रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण कशी झाली? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. आता रवी शास्त्री कोरोनाच्या संपर्कात कसे आले, याचं कारण समोर आलं आहे. रवी शास्त्री टीम हॉटेलमध्येच आपल्या पुस्तकाच्या विमोचनाच्या कार्यक्रमाला गेले होते, त्यावेळी शास्त्री कोरोनाच्या संपर्कात आल्याचं वृत्त आहे. या कार्यक्रमात भरत अरुण, नितीन पटेल आणि आर.श्रीधरदेखील सहभागी झाले होते. रवी शास्त्री, भरत अरुण आणि आर.श्रीधर आता टीम इंडियासोबत मॅनचेस्टरलाही जाणार नाहीत. 10 सप्टेंबरपासून सीरिजच्या पाचव्या टेस्टला सुरुवात होणार आहे. या तिघांना लंडनमध्येच क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. तसंच कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच हे तिघं भारतात परतू शकतील. पाचवी टेस्ट झाल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलसाठी (IPL 2021) युएईला रवाना होतील. आयपीएल संपल्यानंतर टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) युएईमध्येच खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारताचा कोचिंग स्टाफ इंग्लंड दौऱ्याहून भारतात परत येईल आणि काही दिवसांनी युएईला रवाना होईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, India vs england, Ravi shastri

    पुढील बातम्या