Home /News /sport /

IND vs ENG : मुंबई पुन्हा होणार क्रिकेटचं पॉवर हाऊस, इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी 5 खेळाडू सज्ज

IND vs ENG : मुंबई पुन्हा होणार क्रिकेटचं पॉवर हाऊस, इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी 5 खेळाडू सज्ज

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये तब्बल 5 मुंबईकर खेळाडू टीम इंडियाचा भाग आहेत.

    मुंबई, 27 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या सत्रातली ही पहिलीच सीरिज असल्यामुळे टीम इंडिया चांगली सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरेल. 2007 नंतर भारताला इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही, त्यामुळे हे रेकॉर्ड पुसण्याचाही टीम इंडियाचा प्रयत्न आहे, पण सीरिज सुरु होण्याआधीच टीम इंडियाला तीन धक्के लागले. शुभमन गिल (Shubhaman Gill), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि आवेश खान (Avesh Khan) यांना दुखापत झाल्यामुळे दोन नव्या खेळाडूंना इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे, यामुळे इंग्लंड दौऱ्यावर मुंबईकर खेळाडूंची संख्या 5 होणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर मुंबईचे इतके खेळाडू भारतीय टीममध्ये असणार आहे. श्रीलंका दौरा आटोपल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) इंग्लंडला रवाना होतील. तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आधीच इंग्लंडमध्ये आहेत. टीम इंडियातल्या खेळाडूंचा फॉर्म बघता, या पाचही मुंबईकर खेळाडूंना एकाच सामन्यात संधी मिळण्याचीही शक्यता आहे. पृथ्वी शॉ-रोहित ओपनर शुभमन गिलला दुखापत झाल्यामुळे पृथ्वी शॉ श्रीलंका दौऱ्यानंतर लगेच इंग्लंडला रवाना होणार आहे. ओपनरची जागा खाली झाल्यामुळे आणि मयंक अग्रवालला मोठा स्कोअर न करता आल्यामुळे पृथ्वी शॉला रोहित शर्मासोबत ओपनिंगला खेळण्याची संधी मिळू शकते, पण इंग्लंडमधल्या 10 दिवसांच्या क्वारंटाईन नियमांमुळे पृथ्वी शॉ दुसऱ्या टेस्टपासून उपलब्ध होईल. सूर्यकुमार यादव 5 महिन्यांपूर्वीच टी-20 मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सूर्यकुमार यादवने धमाकेदार कामगिरी केली आहे, याचमुळे त्याची आता टेस्ट सीरिजसाठीही निवड झाली आहे. सूर्याचा सध्याचा फॉर्म बघता त्याला टेस्ट सीरिजमध्ये संधी देण्याचा विचार विराट करू शकतो. अजिंक्य रहाणे मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये केलेल्या धडाकेबाज शतकानंतर अजिंक्य रहाणेला फार चमकदार कामगिरी करता आली नाही. रहाणेच्या फॉर्ममधल्या चढ उतारामुळे त्याच्या टीममधल्या स्थानावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे रहाणे सराव सामनाही खेळू शकला नव्हता. दुखापतीतून बरा झाल्यानंतरही टीकाकारांना बॅटने प्रत्युत्तर द्यायचं आव्हान रहाणेपुढे असेल. शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून शार्दूल ठाकूरने स्वत:ला सिद्ध केलं. ब्रिस्बेनमधल्या विजयामुळे भारताने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकली, या विजयात शार्दूलचा मोलाचा वाटा होता. या सामन्यात शार्दुल बॅट आणि बॉलनेही चमकला. या सामन्यानंतर मात्र त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. इंग्लंडमधलं स्विंग बॉलिंगला मदत करणारं वातावरण आणि शार्दूलची उपयोगी बॅटिंग बघता विराट कोहली त्याला 11 खेळाडूंमध्ये संधी द्यायचाही विचार करू शकतो.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs england, Mumbai

    पुढील बातम्या