मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : इंग्लंडचे हे 5 खेळाडू टीम इंडियासाठी ठरणार धोकादायक!

IND vs ENG : इंग्लंडचे हे 5 खेळाडू टीम इंडियासाठी ठरणार धोकादायक!

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला बुधवारपासून सुरुवात होत आहे. घरच्या मैदानात इंग्लंडच्या टीमची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. त्यामुळे जो रूट (Joe Root) याच्या नेतृत्वात इंग्लंडची टीम पुन्हा याची पुनरावृत्ती करण्यासाठी मैदानात उतरेल.

पुढे वाचा ...

नॉटिंघम, 3 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला बुधवारपासून सुरुवात होत आहे. घरच्या मैदानात इंग्लंडच्या टीमची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. त्यामुळे जो रूट याच्या नेतृत्वात इंग्लंडची टीम पुन्हा याची पुनरावृत्ती करण्यासाठी मैदानात उतरेल. टीम इंडियाने इंग्लंडमध्ये 62 टेस्ट खेळल्या, यातल्या फक्त 7 टेस्टमध्ये भारताला विजय मिळाला, तर 34 मॅच इंग्लंडने जिंकल्या. 2007 नंतर टीम इंडियाला इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकता आली नाही. यावेळीही इंग्लंडचे 5 खेळाडू टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

जो रूट : इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याची भारताविरुद्धची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याने भारताविरुद्ध 20 टेस्टमध्ये 5 शतकं आणि 9 अर्धशतकं केली. एवढच नाही तर त्याने 54 च्या सरासरीने 1,789 रन केले. 218 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. भारताविरुद्ध सर्वाधिक रन करणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंच्या यादीत रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. एलिस्टर कूकने भारताविरुद्ध सर्वाधिक 2,431 रन केले.

जॉस बटलर : टेस्ट क्रिकेटमध्येही आक्रमक बॅटिंग करणारा जॉस बटलर (Jos Buttler) टीम इंडियासाठी अडचणीचा ठरू शकतो. भारताविरुद्ध 12 टेस्टमध्ये त्याने 42 च्या सरासरीने 757 रन केले, यात एक शतक आणि 5 अर्धशतकं आहेत. याशिवाय विकेटच्या मागे त्याने 26 शिकारही केल्या.

जेम्स अंडरसन : इंग्लंडचा जेम्स अंडरसन (James Anderson) टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फास्ट बॉलर आहे. भारताविरुद्धही त्याची कामगिरी शानदार आहे. भारताविरुद्ध 30 टेस्टमध्ये त्याने 118 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडच्या बॉलरचं भारताविरुद्धचं ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताविरुद्ध अंडरसनने 4 वेळा 5 विकेट घेतल्या. इंग्लंडमधल्या स्विंग होणाऱ्या वातावरणात अंडरसनने नेहमी बॅट्समनना त्रास दिला आहे.

स्टुअर्ट ब्रॉड : अंडरसनप्रमाणेच स्टुअर्ट ब्रॉडही (Stuart Broad) इंग्लंडमधल्या खेळपट्टीवर प्रभावी ठरला आहे. भारताविरुद्धच्या 22 टेस्टमध्ये 27 च्या सरासरीने त्याने 70 विकेट घेतल्या, यात 2 वेळा 5 विकेटचा समावेश आहे. 25 रन देऊन 6 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. नव्या बॉलने ब्रॉड आणि अंडरसन भेदक जोडी मानली जाते.

सॅम करन : बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीमध्ये ऑलराऊंडर सॅम करन (Sam Curran) इंग्लंडसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. भारताविरुद्ध करनने 4 टेस्टमध्ये 39 च्या सरासरीने 272 रन केले, यात 2 अर्धशतकंही आहेत. बॉलिंगमध्ये त्याने 24 च्या सरासरीने 11 विकेटही घेतल्या.

भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये 18 टेस्ट सीरिज झाल्या आहेत. यातल्या 3 सीरिजमध्येच भारताला विजय मिळवला, तर इंग्लंडने 14 सीरिज जिंकल्या, एक सीरिज बरोबरीमध्ये सुटली. भारताला 2007 साली इंग्लंडमध्ये अखेरचा विजय मिळाला होता, त्यावेळी भारताचा 1-0 ने विजय झाला होता. यानंतर झालेल्या तिन्ही सीरिजमध्ये टीम इंडियाचा विजय झाला होता.

First published:

Tags: Cricket, India vs england