मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : विराट-शास्त्रींसाठी दोन जागांची डोकेदुखी, अशी असणार टीम इंडियाची Playing XI!

IND vs ENG : विराट-शास्त्रींसाठी दोन जागांची डोकेदुखी, अशी असणार टीम इंडियाची Playing XI!

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यापुढे अंतिम 11 खेळाडू निवडणं डोकेदुखी ठरणार आहे.

  • Published by:  Shreyas

नॉटिंघम, 4 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे. टेस्ट सीरिज सुरू व्हायच्या आधीच शुभमन गिल (Shubhaman Gill), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि आवेश खान बाहेर झाले आहेत, तर सरावादरम्यान मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) डोक्याला बॉल लागल्यामुळे तो पहिली टेस्ट खेळू शकणार नाही, त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यापुढे अंतिम 11 खेळाडू निवडणं डोकेदुखी ठरणार आहे. गेल्या काही सीरिजपासून टीम इंडिया मॅचच्या 24 तास आधी टीम घोषित करते, यावेळी मात्र आपण टॉसवेळीच याची घोषणा करू, असं विराटने सांगितलं.

पहिल्या टेस्टमध्ये ओपनर म्हणून मयंक अग्रवालऐवजी केएल राहुल आणि ऑलराऊंडर म्हणून जडेजा किंवा शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. सध्या भारतीय टीममध्ये फक्त दोनच ओपनर आहेत, त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांची जोडी निश्चित मानली जात आहे. राहुलने सराव सामन्यातमध्ये शतक करत आपण फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाने हनुमा विहारीलाही ओपनिंगला खेळवलं होतं, पण त्याला चमकदार कामगिरी दाखवता आली नव्हती.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये विराट कोहलीने रवींद्र जडेजाला कमी ओव्हर बॉलिंग दिली होती, त्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विराट शार्दुल ठाकूरला खेळवू शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेन टेस्टमध्ये शार्दुलने धमाकेदार अर्धशतक केलं होतं, तसंच 7 विकेटही घेतल्या होत्या. भारताच्या ऐतिहासिक विजयात शार्दुलची भूमिका मोलाची ठरली होती. इंग्लंडच्या स्विंग होणाऱ्या खेळपट्टीवर शार्दुल बॉलिंगमध्येही उजवा ठरू शकतो.

मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा फास्ट बॉलिंगचं आक्रमण सांभाळत असले तरी दोघांच्या फॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार पाहायला मिळाला आहे, तसंच बुमराह कंबरेच्या फ्रॅक्चरनंतर आधीसारखं यश मिळवण्यात अपयशी ठरत आहे, त्यामुळे मोहम्मद सिराजचा पर्यायही विराटकडे उपलब्ध आहे.

भारताची संभाव्य प्लेयिंग 11

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा/शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा/मोहम्मद सिराज

First published:

Tags: India vs england, Virat kohli