नॉटिंघम, 5 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या (India vs England) ओपनर्सनी चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यामध्ये 97 रनची पार्टनरशीप झाली. पण लंचआधीच्या अखेरच्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने त्याची विकेट गमावली. ओली रॉबिनसनने (Ollie Robinson) टाकलेल्या बाऊन्सरवर रोहित शर्मा हूक मारायला गेला पण फाईन लेगवर उभ्या असलेल्या सॅम करनने (Sam Curran) त्याचा कॅच पकडला. 107 बॉलमध्ये 36 रन करून रोहित आऊट झाला. चांगल्या सुरुवातीनंतरही आऊट झाल्यावर रोहित शर्माच्या चेहऱ्यावर निराशा दिसली. सॅम करनने कॅच पकडल्यानंतर रोहित शर्माने चिडून बॅच पिचच्या दिशेने फिरवली.
A rush of blood & Rohit Sharma departs just before lunch 😩 How costly will that wicket be for 🇮🇳? 👀 Tune into #SonyLIV now 👉 https://t.co/E4Ntw2hJX5 📺📲#ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #RohitSharma #Wicket pic.twitter.com/I6wn8qwCRF
— SonyLIV (@SonyLIV) August 5, 2021
रोहित शर्माने पुन्हा एकदा तीच चूक केली. चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. लंचच्या आधीची शेवटची ओव्हर असल्याचं माहिती असतानाही रोहितने हूक मारण्याचा प्रयत्न केला, या सापळ्यात तो फसला. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (WTC Final) रोहितने चांगली सुरुवात केल्यानंतर विकेट गमावली होती.
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनीही ही सीरिज सुरू व्हायच्या आधी रोहित शर्मावर निशाणा साधला होता. हिंदुस्तान टाईम्समध्ये संजय मांजरेकर यांनी स्तंभ लिहिला होता. 'अशा खेळाडूला टीममध्ये ठेवण्यात काहीच फायदा नाही, ज्याने 40 टेस्ट खेळल्या आणि त्याचं वय 34 वर्ष आहे. भारतीय खेळपट्टीवर तुम्ही मोठा स्कोअर करता, पण परदेशात नाही,' असं मांजरेकर म्हणाले होते.
रोहित शर्माच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये परदेशात एकही शतक नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये रोहित शर्माने 34 आणि 30 रन केले होते. 2019 साली रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनिंग करायला सुरुवात केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Rohit sharma