नॉटिंघम, 6 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England) 95 रनची मोठी आघाडी घेऊन मॅचवरची आपली पकड आणखी मजबूत केली आहे. केएल राहुलच्या (KL Rahul) 84 रन तसंच रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) केलेल्या 56 रनमुळे भारताला 278 रनपर्यंत मजल मारता आली. टीमच्या टेलएंडर्सनीही धडाकेबाज बॅटिंग केली. बुमराहने (Jasprit Bumrah) 28 रन, मोहम्मद शमीने (Mohammad Shami) 13 रन आणि मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) नाबाद 7 रनची खेळी केली.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अर्धशतकी खेळी बरोबरच रविंद्र जडेजाने महान क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 2 हजार रन आणि 200 विकेट घेणारा जडेजा पाचवा खेळाडू बनला आहे.
Sir Jadeja perishes soon after completing his half-century ☹️ A fine knock is ended by Robinson 👏 Tune into #SonyLIV now 👉 https://t.co/E4Ntw2hJX5 📺📲#ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #RavindraJadeja #Fifty #Wicket pic.twitter.com/6slXLUB7Ti
— SonyLIV (@SonyLIV) August 6, 2021
रविंद्र जडेजाने 53 टेस्टमध्येच 2 हजार रन आणि 200 विकेटचा टप्पा ओलांडला आहे. इंग्लंडचे इयन बोथम यांनी 43 टेस्टमध्ये, कपिल देव यांनी 50 टेस्टमध्ये, इम्रान खाननी 50 टेस्टमध्ये आणि आर.अश्विनने 51 टेस्टमध्ये हा टप्पा गाठला होता.
टेस्ट क्रिकेटमध्ये 2 हजार रन आणि 200 विकेट घेणारा रविंद्र जडेजा पाचवा भारतीय खेळाडू आहे. कपिल देव, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि आर.अश्विन यांनी याआधी या विक्रमाला गवसणी घातली. रविंद्र जडेजाने 86 बॉलमध्ये 56 रन केले, यामध्ये 8 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Ravindra jadeja