नॉटिंघम, 5 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाने (India vs England) धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी भारताने इंग्लंडचा 183 रनवर ऑल आऊट केला. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मोहम्मद शमीला (Mohammad Shami) 3, शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) 2 आणि मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) 1 विकेट मिळाली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण इंग्लंडची सुरुवात खराब झाली.
इंग्लंडचा स्कोअर 138/3 होता, पण त्यांची बॅटिंग गडगडली आणि 160 रनवर 9 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले, म्हणजेच 22 रनवर त्यांनी 6 विकेट गमावल्या. इंग्लंडची संपूर्ण टीम 65.4 ओव्हरमध्ये 183 रनवर ऑल आऊट झाली.
फास्ट बॉलर्सनी घेतल्या 10 विकेट
भारताच्या फास्ट बॉलर्सनी इंग्लंडच्या सगळ्या 10 विकेट घेतल्या. याआधी इंग्लंडमध्ये तीनवेळा भारताच्या फास्ट बॉलर्सनी अशी कामगिरी केली होती, तेव्हा इंडियाचा पराभव झाला नाही. एक मॅच जिंकण्यात भारताला यश आलं तर दोन मॅच ड्रॉ झाल्या. 4 पैकी 3 वेळा तर नॉटिंघममध्येच भारताच्या फास्ट बॉलर्सनी सगळ्या 10 विकेट मिळवल्या. मागच्या इंग्लंड दौऱ्यातही भारताला नॉटिंघममध्ये विजय मिळाला होता, पण टीमने सीरिज 4-1 ने गमावली होती.
भारत आणि इंग्लंड यांच्यातली इंग्लंडमधली ही 19 वी सीरिज आहे. याआधी झालेल्या 18 सीरिजपैकी 3 सीरिजमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, तर 14 सीरिज इंग्लंडने जिंकल्या. 2007 साली भारताला इंग्लंडमध्ये शेवटची सीरिज जिंकता आली. इंग्लंडमध्ये दोन्ही टीममधली ही 63 वी टेस्ट आहे. इंग्लंडने 34 टेस्ट जिंकल्या, तर टीम इंडियाला फक्त 7 टेस्ट जिंकता आल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england