मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : 'हा तर मूर्खपणा', अजिंक्य रहाणेच्या 'गिफ्ट'वर क्रिकेट चाहते संतापले

IND vs ENG : 'हा तर मूर्खपणा', अजिंक्य रहाणेच्या 'गिफ्ट'वर क्रिकेट चाहते संतापले

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही टीम इंडियाची (India vs England) कागदावर मजबूत असणारी बॅटिंग कोसळली. पुजारा आणि विराटची विकेट गेल्यानंतर टीमचा उपकर्णधार असलेल्या रहाणेने (Ajinkya Rahane) घोडचूक केली.

  • Published by:  Shreyas

नॉटिंघम, 5 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही टीम इंडियाची (India vs England) कागदावर मजबूत असणारी बॅटिंग कोसळली. भारताच्या बॅट्समनना पुन्हा एकदा अपयश आल्यामुळे भारतीय क्रिकेट रसिक चांगलेच संतापले. यात टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला सर्वाधिक रोषाचा सामना करावा लागत आहे.

पुजारा आणि विराटची विकेट गेल्यानंतर टीमचा उपकर्णधार असलेल्या रहाणेने (Ajinkya Rahane) सेट झालेल्या राहुलसोबत संयमाने खेळण्याची गरज होती, पण तो नसलेली रन धावायला गेला आणि रन आऊट झाला. आऊट व्हायच्या आधीही रहाणेने एकदा धोकादायक रन काढली. त्यावेळी इंग्लंडच्या फिल्डरचा बॉल स्टम्पला लागला नाही, त्यामुळे तो बचावला. 5 बॉलमध्ये 5 रन करून रहाणे आऊट झाला.

रॉबिनसनच्या बॉलिंगवर केएल राहुलने ऑफ साईडच्या दिशेने बॉल मारला, यानंतर राहुलने रन काढायला नकार दिला, तरीही रहाणे धावत राहिला. पॉईंटवर उभ्या असलेल्या बेयरस्टोने डायरेक्ट हिट मारून रहाणेची विकेट घेतली.

मागच्या काही सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेला रन आऊटची समस्या भेडसावत आहे. टेस्ट क्रिकेटमधल्या पहिल्या 204 पार्टनरशीपमध्ये रहाणे एकदाही रन आऊट झाला नाही, तसंच त्याने त्याच्या एकाही सहकारी बॅट्समनला रन आऊट केलं नाही, पण मागच्या 33 पार्टनरशीपमध्ये रहाणे 4 रन आऊटमध्ये सहभागी होता, यापैकी तो स्वत: 2 वेळा आऊट झाला.

First published:

Tags: Ajinkya rahane, India vs england