मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : बंदीनंतरही सुधारला नाही रॉबिनसन, राहुलसोबतच्या गैरवर्तनाचा VIDEO

IND vs ENG : बंदीनंतरही सुधारला नाही रॉबिनसन, राहुलसोबतच्या गैरवर्तनाचा VIDEO

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टवर टीम इंडियाने (India vs England) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. भारताची बॅटिंग सुरू असताना ओली रॉबिनसनने (Ollie Robinson) केएल राहुलसोबत (KL Rahul) केलेल्या गैरवर्तनामुळे चाहते संतापले.

नॉटिंघम, 6 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टवर टीम इंडियाने (India vs England) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. इंग्लंडचा 183 रनवर ऑल आऊट केल्यानंतर भारताने 278 रन केले, त्यामुळे 95 रनची महत्त्वाची आघाडी टीम इंडियाला मिळाली. केएल राहुलच्या (KL Rahul) 84 रन, रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) 56 रन तसंच टेलएंडर्सनी केलेल्या धडाकेबाज बॅटिंगमुळे भारताला एवढी आघाडी घेण्यात यश आलं. बुमराहने (Jasprit Bumrah) 28 रन, मोहम्मद शमीने (Mohammad Shami) 13 रन आणि मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) नाबाद 7 रनची खेळी केली.

टीम इंडियाची ही बॅटिंग पाहून इंग्लंडचे खेळाडू वैतागलेले दिसले. ओली रॉबिनसनने (Ollie Robinson) पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या असल्या तरी चुकीच्या कारणांमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. केएल राहुल याला धक्का मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

50 वी ओव्हर सुरू असताना रन काढल्यानंतर ओली रॉबिनसन केएल राहुलला काही तरी बोलला, यावर राहुलनेही त्यावर प्रतिक्रिया दिली. यानंतर बॉलिंगला जात असताना रॉबिनसनने राहुलला धक्का मारला. रॉबिनसनच्या या कृतीमुळे त्याच्यावर सोशल मीडियावरून टीका करण्यात येत आहे.

ओली रॉबिनसनची ही दुसरीच टेस्ट आहे, पण तो पुन्हा एकदा वादात सापडला आहे. जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून रॉबिनसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्या टेस्टनंतर लगेचच रॉबिनसनची जुनी ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाली. रॉबिनसनची ही ट्वीट वर्णद्वेषी आणि लिंगभेदी असल्याचे आरोप झाले. याप्रकरणाची इंग्लंड क्रिकेट बोर्डाने चौकशी केली. चौकशी होईपर्यंत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

First published:
top videos

    Tags: India vs england, Kl rahul