नॉटिंघम, 5 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी चांगल्या सुरुवातीनंतर टीम इंडियाची (India vs England) बॅटिंग गडगडली आहे. 125/4 विकेट गेल्यानंतर खराब प्रकाश आणि पावसामुळे खेळ थांबवण्यात आला, यानंतर लगेचच चहाची विश्रांती घेण्यात आली, पण नंतर फक्त तीन बॉलचाच खेळ झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी भारताला 97 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली, पण रोहित शर्मा 36 रन करून आऊट झाला. रोहितची विकेट गेल्यानंतर लगेचच लंच घेण्यात आला. लंचनंतर लगेचच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 4 रनवर आणि पुढच्या बॉलला विराट कोहली (Virat Kohli) शून्य रनवर आऊट झाले. जेम्स अंडरसनने (James Anderson) दोघांना आऊट केलं. विराट आणि पुजारा आऊट झाल्यानंतर अजिंक्य रहाणेनेही (Ajinkya Rahane) घोडचूक केली. रन नसताना रहाणे धावला आणि या गोंधळात तो रन आऊट झाला. रहाणेला 5 बॉलमध्ये 5 रन करता आले. टीम इंडिया अजून 58 रननी पिछाडीवर आहे. केएल राहुल 57 रनवर नाबाद आणि ऋषभ पंत 7 रनवर खेळत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टचा पहिला दिवस भारतीय बॉलर्सनी (India vs England 1st Test) गाजवला, यानंतर आता दुसऱ्या दिवशी भारतीय बॅट्समनसमोर इंग्लंडच्या फास्ट बॉलर्सचं कडवं आव्हान असणार आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 21/0 असा होता. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) प्रत्येकी 9 रनवर नाबाद खेळत होते. गेल्या काही दिवसांपासून भारताची टॉप-ऑर्डर संघर्ष करताना दिसत आहे.
Two in two & Trent Bridge is alive & kicking as are clawing their way back
Tune into #SonyLIV now https://t.co/E4Ntw2hJX5 #ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #CheteshwarPujara #ViratKohli #Wickets pic.twitter.com/t7gqB7g7QF — SonyLIV (@SonyLIV) August 5, 2021
What is happening?
seem to have lost all track with a needless run-out! Tune into #SonyLIV now https://t.co/E4Ntw2hJX5 #ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #AjinkyaRahane #Wicket pic.twitter.com/9WNrOclPdR — SonyLIV (@SonyLIV) August 5, 2021
A rush of blood & Rohit Sharma departs just before lunch
How costly will that wicket be for ? Tune into #SonyLIV now https://t.co/E4Ntw2hJX5 #ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #RohitSharma #Wicket pic.twitter.com/I6wn8qwCRF — SonyLIV (@SonyLIV) August 5, 2021
न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (WTC Final) स्विंग बॉलिंगसमोर भारताच्या दिग्गज बॅट्समनचा निभाव लागला नाही. विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोघांना गेल्या दोन वर्षांमध्ये शतक करता आलेलं नाही, तर केएल राहुलचीही पुनरागमनानंतरची ही पहिलीच मॅच आहे. रोहित शर्मालाही चांगल्या सुरुवातीनंतर मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं आहे, त्यामुळे पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी टीम इंडियाच्या बॅट्समनना झगडावं लागणार आहे.
LIVE Score पाहण्यासाठी क्लिक करा
पहिला दिवस बॉलर्सचा
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण भारताच्या बॉलर्सनी इंग्लंडला सुरुवातीपासूनच धक्के दिले. 183 रनवर इंग्लंडचा ऑल आऊट झाला. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मोहम्मत शमीला (Mohammad Shami) 3, शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) 2 आणि मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) 1 विकेट घेण्यात यश आलं. जो रूटने सर्वाधिक 64 रनची खेळी केली. इंग्लंडचे 4 खेळाडू शून्य रनवर आऊट झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Kl rahul, Rohit sharma