नॉटिंघम, 5 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही टीम इंडियाची (India vs England) कागदावर मजबूत असणारी बॅटिंग कोसळली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी भारताला 97 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. लंचआधी ओली रॉबिनसनच्या (Ollie Robinson) बाऊन्सरवर रोहित शर्मा हूक मारायला गेला, पण फाईन लेगवर असलेल्या सॅम करनने (Sam Curran) रोहित शर्माचा कॅच पकडला. रोहित 36 रन करून माघारी परतला.
रोहितची विकेट गेल्यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 4 रन करून आऊट झाला. जेम्स अंडरसनच्या (James Anderson) बॉलिंगवर विकेट कीपर जॉस बटलरने (Jos Buttler) पुजाराचा कॅच पकडला. यानंतर लगेचच पुढच्या बॉलवर अंडरसनने विराट कोहलीला (Virat Kohli) माघारी पाठवलं. जॉस बटलरनेच विराटचा पहिल्याच बॉलला कॅच पकडला.
Two in two & Trent Bridge is alive & kicking as are clawing their way back
Tune into #SonyLIV now https://t.co/E4Ntw2hJX5 #ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #CheteshwarPujara #ViratKohli #Wickets pic.twitter.com/t7gqB7g7QF — SonyLIV (@SonyLIV) August 5, 2021
What is happening? 😳 🇮🇳 seem to have lost all track with a needless run-out! Tune into #SonyLIV now 👉 https://t.co/E4Ntw2hJX5 📺📲#ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #AjinkyaRahane #Wicket pic.twitter.com/9WNrOclPdR
— SonyLIV (@SonyLIV) August 5, 2021
पुजारा आणि विराटची विकेट गेल्यानंतर टीमचा उपकर्णधार असलेल्या रहाणेने (Ajinkya Rahane) सेट झालेल्या राहुलसोबत संयमाने खेळण्याची गरज होती, पण तो नसलेली रन धावायला गेला आणि रन आऊट झाला. आऊट व्हायच्या आधीही रहाणेने एकदा धोकादायक रन काढली. त्यावेळी इंग्लंडच्या फिल्डरचा बॉल स्टम्पला लागला नाही, त्यामुळे तो बचावला. 5 बॉलमध्ये 5 रन करून रहाणे आऊट झाला.
भारतीय बॅट्समनची सुपर फ्लॉप कामगिरी
मागच्या दोन वर्षांपासून टीम इंडियाच्या बॅट्समनची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. या दोन वर्षात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला शतक करता आलेलं नाही. तर अजिंक्य रहाणेची कामगिरीही निराशाजनक झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये रहाणने शतक केलं होतं, यानंतर मात्र रहाणेला मोठा स्कोअर करता आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, India vs england, Pujara, Virat kohli