मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : लॉर्ड्सवर सुरक्षेमध्ये मोठी चूक, कोरोना संकटात खेळाडूंच्या जीवाशी खेळ

IND vs ENG : लॉर्ड्सवर सुरक्षेमध्ये मोठी चूक, कोरोना संकटात खेळाडूंच्या जीवाशी खेळ

कोरोनाच्या संकटात खेळाडूंच्या जीवाशी खेळ

कोरोनाच्या संकटात खेळाडूंच्या जीवाशी खेळ

भारत आणि इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्स (Lords Cricket Ground) मैदानात दुसरी टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी सुरक्षेमध्ये एक नाही तर दोन मोठ्या चुका झाल्या.

लंडन, 14 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्स (Lords Cricket Ground) मैदानात दुसरी टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी सुरक्षेमध्ये एक नाही तर दोन मोठ्या चुका झाल्या. तिसऱ्या दिवशी लंचनंतर एक व्यक्ती स्टेडियममधून थेट मैदानात आला. कोरोनाच्या संकटात स्टेडियममधून एक व्यक्ती थेट खेळाडूंच्या जवळ येत असल्यामुळे खेळाडूंच्या जीवाशी खेळ होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लॉर्ड्सच्या मैदानावर असलेला इंग्लंडचा प्रेक्षक टीम इंडियाची जर्सी घालून मैदानात आला. 74 व्या ओव्हरदरम्यान ही घटना घडली. सुरक्षा रक्षकांनी या चाहत्याला मग मैदानाबाहेर काढलं.

मॅचच्या तिसऱ्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक मोठी चूक झाली. टीम इंडिया फिल्डिंग करत होती, तेव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या काही प्रेक्षकांनी राहुलवर दारूच्या बॉटलची झाकणं फेकली. केएल राहुल (KL Rahul) जेव्हा बाऊंड्री लाईनवर उभा होता तेव्हा प्रेक्षकांनी हे लाजिरवाणं कृत्य केलं. सोशल मीडियावर इंग्लंडच्या प्रेक्षकांच्या या निर्लज्जपणाचा व्हिडिओ शेयर केला जात आहे. 68 व्या ओव्हरदरम्यान ही घटना घडली.

इंग्लिश चाहत्यांचं हे कृत्य पाहून केएल राहुल आणि विराट कोहली (Virat Kohli) चांगलेच भडकले. विराटने तर राहुलला ही झाकणं पुन्हा प्रेक्षकांच्या दिशेने फेकायला सांगितली.

सोशल मीडियावर इंग्लंडच्या प्रेक्षकांच्या या कृत्यावर जोरदार टीका होत आहे. मैदानात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ खेळही थांबवण्यात आला होता. यावेळी विराटने राहुलला ही झाकणं पुन्हा स्टॅण्डमध्ये फेकण्याचा इशारा केला. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.

First published:

Tags: India vs england