Home /News /sport /

IND vs ENG: BCCI ने टीम इंडियाला दिली सूट, पण इंग्लंड क्रिकेट बोर्ड टेन्शनमध्ये

IND vs ENG: BCCI ने टीम इंडियाला दिली सूट, पण इंग्लंड क्रिकेट बोर्ड टेन्शनमध्ये

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. 4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे.

    लंडन, 16 जुलै: टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. 4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. पण सीरिजआधी टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं (ECB) टेन्शन मात्र वाढलं आहे. या सीरिजमधून इंग्लंड क्रिकेट बोर्डाला बक्कळ कमाई होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये 24 खेळाडू आहेत. 23 जूनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final) झाल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना ब्रेक देण्यात आला. या काळात ऋषभ पंत आणि टीमचे थ्रोडाऊन तज्ज्ञ दयानंद जारानी यांना कोरोनाची लागण झाली. टीममधल्या इतर सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. टेस्ट सीरिजआधी टीमला दोन सराव सामने खेळायचे आहेत. यातला पहिला सामना 20 जुलैपासून सुरू होणार आहे. या मॅचमधून पंत आणि ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) बाहेर झाले आहेत. साहा दयानंद यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यालाही क्वारंटाईन व्हावं लागलं आहे, पण त्याची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड क्रिकेट बोर्डाला या सीरिजमधून 1 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. पण बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंना दिलेल्या ब्रेकमुळे सीरिजवर संकट ओढावलं आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत, याचा परिणाम सीरिजवर होऊ शकतो. ही सीरिज पुढेही ढकलली जाऊ शकत नाही, कारण यानंतर लगेच आयपीएल (IPL) सुरू होणार आहे. तसंच आयपीएलनंतर टी-20 वर्ल्ड कपही (T20 World Cup) आहे. इंग्लंडच्या सगळ्या खेळाडूंना अजून लशीचा दुसरा डोस देण्यात आलेला नाही. काऊंटीमध्ये खेळणारे अनेक खेळाडू पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या द हंड्रेडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक बड्या खेळाडूंनी आधीच या स्पर्धेतून माघार घेतली आहे. द हंड्रेड ही स्पर्धा मागच्यावर्षीच सुरू होणार होती, पण कोरोनामुळे स्थगित करण्यात आली. महिला टीममध्ये भारताकडून शफाली वर्मा, स्मृती मंधनासह 5 खेळाडू खेळणार आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs england, Rishabh pant

    पुढील बातम्या