Home /News /sport /

IND vs ENG : टीम इंडियाचे खेळाडू संकटात! आजूबाजूला कोरोनाचा कहर

IND vs ENG : टीम इंडियाचे खेळाडू संकटात! आजूबाजूला कोरोनाचा कहर

टीम इंडिया (Team India) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, पण खेळाडूंसमोर कोरोनाचं संकट आणखी वाढत चाललं आहे. इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये (County Cricket) कोरोनाने (Corona Virus) शिरकाव केला आहे.

    लंडन, 12 जुलै : टीम इंडिया (Team India) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, पण खेळाडूंसमोर कोरोनाचं संकट आणखी वाढत चाललं आहे. इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये (County Cricket) कोरोनाने (Corona Virus) शिरकाव केला आहे. डर्बीशायर आणि एसेक्स यांच्यात डर्बीमध्ये सुरू असलेला सामना सोमवारी एका खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे रद्द करण्यात आला. डर्बीशायरचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर.अश्विनही (R Ashwin) काऊंटीमध्ये खेळत आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या खेळाडूने स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. टीमचे अन्य खेळाडूही या क्रिकेटपटूच्या संपर्कात आले होते, त्यामुळे अंपायरनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला, असं ईसीबने सांगितंल आहे. क्रिकेट बोर्ड डर्बीशायर आणि एसेक्स काऊंटी क्लबसोबत काम करत आहे. खेळाडू, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मॅचच्या पॉईंट्सची घोषणा नंतर केली जाईल, असं बोर्डाने स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे गेल्या काही काळापासून ऑस्ट्रेलियन टीमबाहेर असलेला पीटर हॅण्ड्सकॉम्ब (Peter Handscomb) याला कोरोना झाला आहे. यामुळे हॅण्ड्सकॉम्ब लँकशायरविरुद्धच्या काऊंटी मॅचमधून बाहेर झाला आहे. 30 वर्षांचा हॅण्ड्सकॉम्ब मिडलसेक्सचं नेतृत्व करत आहे, पण तो रविवारी चॅम्पियनशीपच्या ग्रुप-दोन च्या मॅचमध्ये खेळू शकला नाही. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे हॅण्ड्सकॉम्बला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजआधी इंग्लंड टीममधल्या (England vs Pakistan) 7 जणांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे त्यांना संपूर्ण टीम बदलावी लागली. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या बॅटिंग प्रशिक्षक ग्रॅण्ड फ्लॉवर (Grant Flower) आणि आणखी एका सहकाऱ्याला कोरोना झाला, यामुळे भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली सीरिजही पुढे ढकलण्यात आली. इंग्लिश काऊंटीमधली केंट टीममध्येही कोरोनाचा शिरकाव झाला. एका खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सगळ्यांना 10 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे. केंट 9 जुलैला सरेविरुद्ध किया ओव्हलमध्ये खेळत होती. यानंतर 10 जुलैला टीममधल्या एकाला कोरोना झाल्याचं समोर आलं. यामुळे युके सरकारच्या नियमानुसार टीममधले सगळे जण आयसोलेट झाले आहेत. भारत-इंग्लंड सीरिजवर संकट एकीकडे काऊंटी क्रिकेटमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला असताना भारत-इंग्लंड सीरिजवर संकट ओढावलं आहे. 4 ऑगस्टपासून 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजला सुरुवात होत आहे. टीम इंडियाचे खेळाडू सध्या बायो-बबलमध्ये नसून इंग्लंडमध्ये विश्रांती घेत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर खेळाडू 20 दिवस बायो-बबलच्या बाहेर आहेत. भारत-इंग्लंड यांच्यातली ही टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या सत्रातली पहिली सीरिज असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket, England, Team india

    पुढील बातम्या