मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : चेतेश्वर पुजारा पुन्हा फ्लॉप, विराट कठोर निर्णय घेणार!

IND vs ENG : चेतेश्वर पुजारा पुन्हा फ्लॉप, विराट कठोर निर्णय घेणार!

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडिया (India vs England) डरहममध्ये सराव सामना खेळत आहे. या सामन्यात टीमचा अनुभवी खेळाडू आणि टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा अपयशी ठरला.

  • Published by:  Shreyas

लंडन, 22 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडिया (India vs England) डरहममध्ये सराव सामना खेळत आहे. या सामन्यात टीमचा अनुभवी खेळाडू आणि टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा अपयशी ठरला. काऊंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या (County Select XI) या मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पुजारा 58 बॉलमध्ये 38 रन करून आऊट झाला. या इनिंगमध्ये पुजाराला मयंक अग्रवालसोबत (Mayank Agarwal) ओपनिंगला पाठवण्यात आलं होतं. या दोघांनी 87 रनची पार्टनरशीप केली. मयंक 47 रन करून आऊट झाला. या दोघांना स्पिनर कार्सनने आऊट केलं.

पहिल्या इनिंगमध्येही कार्सननेच पुजाराला माघारी धाडलं होतं. कार्सनच्या बॉलिंगवर पुढे येऊन खेळण्याच्या नादात विकेट कीपिरने त्याला स्टम्पिंग केलं. पहिल्या इनिंगमध्ये त्याला फक्त 21 रन करता आले. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी पुजाराचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) 18 टेस्टमध्ये पुजाराला एकही शतक करता आलं नव्हतं, त्याच्या बॅटमधून 9 अर्धशतकं आली होती आणि त्याने 28.03 च्या सरासरीने 841 रन केले. पुजाराच्या या कामगिरीमुळे त्याचं टीममधलं स्थान धोक्यात आलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (WTC Final) पुजाराच्या संथ खेळीवर टीका झाली होती.

विराट कोहलीनेही (Virat Kohli) फायनलमधल्या पराभवानंतर पुजाराच्या या खेळीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. तेव्हापासूनच पुजाराच्या टीममधल्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये केएल राहुलला (KL Rahul) मधल्या फळीत खेळवण्याचा टीमचा विचार आहे, यासाठी विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो, त्यामुळे पुजाराला बाहेर बसावं लागू शकतं, असंही वृत्त प्रसिद्ध झालं होतं.

पुजाराची इंग्लंडमधली खराब कामगिरी

इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजाराचं रेकॉर्ड खराब आहे. या देशात त्याने 10 टेस्टमध्ये फक्त 27.52 च्या सरासरीने 523 रन केले, यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. पुजाराची ही कामगिरी बघता इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये पुजाराला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

First published:

Tags: Cricket, India vs england, Pujara