मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : County मध्ये अश्विनचा धमाका, स्पिनसमोर विरोधी टीम गारद

IND vs ENG : County मध्ये अश्विनचा धमाका, स्पिनसमोर विरोधी टीम गारद

इंग्लिश काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये (English County Championship) सरेकडून खेळताना अश्विनने (R Ashwin) धमाकेदार कामगिरी केली आहे. समरसेटविरुद्धच्या (Surrey vs Somerset) दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विनने भेदक बॉलिंग केली.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 14 जुलै : इंग्लिश काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये (English County Championship) सरेकडून खेळताना अश्विनने (R Ashwin) धमाकेदार कामगिरी केली आहे. समरसेटविरुद्धच्या (Surrey vs Somerset) दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विनने भेदक बॉलिंग केली. 15 ओव्हरमध्ये 27 रन देऊन त्याने 6 विकेट घेतल्या. अश्विनच्या या कामगिरीमुळे समरसेटचा फक्त 69 रनवर ऑल आऊट झाला. अश्विनशिवाय 22 वर्षांचा डावखुरा स्पिनर डॅन मोरीआर्टीनेही 20 रन देऊन 4 विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये समरसेटने 429 रन केले होते, यानंतर सरेचा 240 रनवर ऑल आऊट झाला. आता सरेला विजयासाठी 259 रनची गरज आहे.

पहिल्या इनिंगमध्ये अश्विनला प्रभाव पाडण्यात अपयश आलं होतं. 43 ओव्हरमध्ये 99 रन देऊन त्याला फक्त एकच विकेट मिळाली होती. सरेचा कर्णधार आणि इंग्लंडचा ओपनर रोरी बर्न्स याने दोन्ही बाजूंनी अश्विनला बॉलिंग करायला दिली. अश्विन 11 वर्षात इंग्लिश काऊंटीमध्य नव्या बॉलने बॉलिंग करणारा पहिलाच स्पिनर ठरला. याआधी 2010 साली जीतन पटेल याने नव्या बॉलने बॉलिंग केली होती. अश्विनने दुसऱ्या इनिंगमध्येही नव्या बॉलने सुरुवात केली.

भारतीय टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. सराव सामन्याची कमतरता बघता अश्विनने या सामन्यात खेळण्यासाठी बीसीसीआयची (BCCI) परवानगी मागितली, बीसीसीआयनेही त्याला ही परवानगी दिली. भारताचे इतर खेळाडू सध्या 20 दिवसांच्या ब्रेकवर आहेत. ते सध्या आपलं कुटुंब आणि मित्रांसोबत इंग्लंडमध्ये फिरत आहेत.

15 जुलैला डरहममध्ये भारतीय खेळाडू एकत्र येतील. पाच टेस्ट मॅचची सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारत-इंग्लंडमधली (India vs England) ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधली पहिलीच सीरिज आहे.

First published:

Tags: India vs england, R ashwin