Home /News /sport /

IND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE

IND vs ENG : अजिंक्य रहाणेच्या दुखापतीबाबत इंग्लंडमधून आली मोठी UPDATE

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs England) दुखापतींनी ग्रासलं आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणेही (Ajinkya Rahane) दुखापतीमुळे सराव सामना खेळू शकले नाहीत.

    लंडन, 27 जुलै : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs England) दुखापतींनी ग्रासलं आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि आवेश खान (Avesh Khan) दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर झाले. यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणेही (Ajinkya Rahane) दुखापतीमुळे सराव सामना खेळू शकले नाहीत. विराट कोहलीची पाठ दुखत असल्यामुळे आणि अजिंक्य रहाणेच्या मांडीच्या मांसपेशी खेचल्या गेल्यामुळे त्यांनी सराव सामन्यातून माघार घेतली. यानंतर विराट कोहली सरावासाठी मैदानात उतरला, तर आता अजिंक्य रहाणेनेही टीम इंडियाला दिलासा दिला आहे. टीम इंडिया सध्या डरहममध्ये आहे. रहाणेने इकडे फिल्डिंग आणि फिजिकल ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. याचसोबत त्याने बॅटिंगचाही सराव केला आहे. दुखापतीचा त्रास कमी करण्यासाठी रहाणेने इंजक्शनही घेतलं होतं, पण आता रहाणेला सराव करताना बघून विराट कोहली आणि रवी शास्त्री यांना नक्कीच दिलासा मिळाला असेल. साऊथम्पटनमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये रहाणेने 49 रन आणि 15 रन केले. यावर्षी इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये रहाणेची बॅट शांत होती. चार टेस्ट मॅचपैकी फक्त एकदाच त्याला अर्धशतक करता आलं होतं. पृथ्वी-सूर्यासमोर संकट श्रीलंका दौऱ्यानंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) इंग्लंडला रवाना होणार होते, पण श्रीलंकेमध्ये कृणाल पांड्याची (Krunal Pandya) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, तसंच कृणाल पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांच्या संपर्कात आला, त्यामुळे या दोघांच्या इंग्लंडमध्ये जाण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, तरी त्यांना इंग्लंडमध्ये 10 दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे, त्यामुळे ते दुसऱ्या टेस्टपासूनच खेळण्यासाठी उपलब्ध होतील. 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे. पहिल्या टेस्टसाठी रहाणे पूर्णपणे फिट झाला नाही, तर त्याच्याऐवजी केएल राहुल (KL Rahul) मैदानात उतरेल. केएल राहुलने सराव सामन्यामध्ये शतक केलं आहे. तसंच शुभमन गिल भारतात आल्यामुळे रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) ओपनिंग करेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, India vs england

    पुढील बातम्या