Home /News /sport /

IND vs ENG : रहाणे शून्यवर आऊट, हीच टेस्ट अजिंक्यसाठी ठरणार अखेरची!

IND vs ENG : रहाणे शून्यवर आऊट, हीच टेस्ट अजिंक्यसाठी ठरणार अखेरची!

भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधली (India tour of England) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे.

    लंडन, 5 सप्टेंबर : भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधली (India tour of England) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये रहाणे शून्य रनवर आऊट झाला. क्रिस वोक्सने (Chris Woakes) रहाणेला एलबीडब्ल्यू केलं. याच ओव्हरमध्ये आधीही इंग्लंडने रहाणेच्या पॅडला बॉल लागल्यानंतर जोरदार अपील केलं. अंपायरनेही रहाणेला आऊट दिलं, यानंतर त्याने डीआरएस घेतला. रिव्ह्यूमध्ये बॉल स्टम्पच्या वरून जात असल्यामुळे रहाणेला जीवनदान मिळालं, पण याचा रहाणेला फायदा उचलता आला नाही. पुढच्याच ओव्हरला वोक्सने रहाणेला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. ओव्हलमध्ये रहाणे तिसऱ्यांदा शून्य रनवर आऊट झाला. या सीरिजच्या 7 इनिंगमध्ये रहाणेने फक्त 109 रन केल्या. या सीरिजमध्ये रहाणेला 5, 1, 61, 18, 10, 14, 0 रन करता आल्या. लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये रहाणेने अर्धशतक केलं, यानंतर त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. रहाणेची बॅटिंग सरासरी 2015 सालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या सीरिजनंतर (59 टेस्टनंतर) पहिल्यांदाच 40 पेक्षा खाली आली आहे. रहाणेने या सीरिजमध्ये काही वेळा चांगली सुरुवात केली, पण त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. ओव्हलमध्ये शून्य रनवर आऊट झाल्यानंतर रहाणेवर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. अनेकांनी तर रहाणेची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच असेल असं भाकितही वर्तवलं. रहाणेचं टेस्ट करियर पॅव्हेलियनमध्ये परत जाताना, असं एका यूजरने लिहिलं. तर दुसऱ्याने #ThankYouRahane आम्ही तुला मिस करणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. रहाणेला पुन्हा संधी मिळाली तर करुण नायरसारख्या खेळाडूंवर अन्याय होईल, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली. जाफरनेही उपस्थित केले प्रश्न याआधी भारताचा माजी ओपनर वसीम जाफर (Wasim Jaffer) यानेही आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आणि रहाणेबाबत आपलं मत व्यक्त केलं. बॅट्समनने चुकीचा शॉट खेळून तरी आपली विकेट गमावू नये. रहाणेची बॅटिंग निराशाजनक आहे. तो बहुतेकवेळा विकेटच्या मागे कॅच देऊन आऊट होत आहे. त्याने मोठी खेळी करण्याची गरज आहे, कारण पुढच्या काही टेस्ट टीमसाठी महत्त्वाच्या आहेत, असं जाफर म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, India vs england

    पुढील बातम्या