Home /News /sport /

IND vs ENG : 'तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर...', विराटचा बेयरस्टोशी पंगा, Video

IND vs ENG : 'तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर...', विराटचा बेयरस्टोशी पंगा, Video

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या (India vs England 5th Test) एजबॅस्टनमध्ये सुरू असलेल्या पाचव्या टेस्टमध्ये जोरदार रोमांच पाहायला मिळत आहे. जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात मैदानातच शाब्दिक चकमक झाली.

पुढे वाचा ...
    एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या (India vs England 5th Test) एजबॅस्टनमध्ये सुरू असलेल्या पाचव्या टेस्टमध्ये जोरदार रोमांच पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या दोन दिवसांमध्ये भारताने मॅचमध्ये आघाडी घेतली. यानंतर तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये वाद पाहायला मिळाला. जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात मैदानातच शाब्दिक चकमक झाली. या दोन्ही खेळाडूंचं भांडण सुरू असताना अंपायरना हस्तक्षेप करावा लागला. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) क्रीजवर होते. खेळ सुरू झाल्यानंतर मोहम्मद शमी बॉलिंग करत असताना स्लिपमध्ये उभा असलेला कोहली आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात बोलणं झालं. मोहम्मद शमीचा बॉल बेयरस्टोला खेळता आला नाही, यानंतर कोहली बेयरस्टोला काहीतरी बोलला. यावर बेयरस्टोने विराटला प्रत्युत्तर दिलं. तेव्हा विराट बेयरस्टोच्या जवळ गेला आणि दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली. या दोघांमधलं संभाषण स्टम्प माईकमध्ये कैद झालं. मला सांगू नको, काय करायचं ते. तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर, असं विराट बेयरस्टोला म्हणाला. विराट कोहली आणि जॉनी बेयरस्टो यांच्यातला वाद थांबवण्यासाठी अंपायरना मध्ये यावं लागलं. दोन्ही अंपायरनी विराट आणि बेयरस्टोला शांत व्हायला सांगितलं. मोहम्मद शमीची ओव्हर संपली तेव्हा विराट आणि बेयरस्टो यांच्यात पुन्हा चर्चा झाली, यावेळी दोघं हसताना दिसले. विराटने घेतलेला हा पंगा टीम इंडियाला मात्र चांगलाच महागात पडला, कारण या वादानंतर जॉनी बेयरस्टोने त्याच्या बॅटिंगचा गियरच बदलला. तिसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत इंग्लंडचा स्कोअर 200/6 एवढा झाला आहे. ते अजूनही 216 रनने पिछाडीवर आहेत. दिवसाची सुरूवात इंग्लंडने 84/5 अशी केली होती. म्हणजेच या सत्रात इंग्लंडने तब्बल 116 रन केल्या. जॉनी बेयरस्टो 113 बॉलमध्ये 91 रनवर नाबाद खेळत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Virat kohli

    पुढील बातम्या