• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • मॅनचेस्टर टेस्ट रद्द झाल्यावर विराटची पहिली प्रतिक्रिया, कॅप्टनला सतावतेय ही चिंता

मॅनचेस्टर टेस्ट रद्द झाल्यावर विराटची पहिली प्रतिक्रिया, कॅप्टनला सतावतेय ही चिंता

भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) रद्द झाल्यानंतर मोठा वाद झाला. इंग्लंडचे माजी खेळाडू आणि तिथल्या मीडियाने पाचवी टेस्ट रद्द व्हायला आयपीएलला (IPL 2021) जबाबदार धरलं. यानंतर आता विराट कोहली (Virat Kohli) याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:
  अबु धाबी, 14 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) रद्द झाल्यानंतर मोठा वाद झाला. इंग्लंडचे माजी खेळाडू आणि तिथल्या मीडियाने पाचवी टेस्ट रद्द व्हायला आयपीएलला (IPL 2021) जबाबदार धरलं. यानंतर आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मॅनचेस्टरमध्ये घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत, असं विराट म्हणाला. विराट कोहली आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये दाखल झाले. पाचवी टेस्ट रद्द झाल्यामुळे भारतीय खेळाडू युएईसाठी लवकर रवाना झाले, त्यामुळे त्यांना आयपीएल सुरू व्हायच्या आधी 6 दिवस क्वारंटाईन होण्यासाठीही वेळ मिळाला. युएईमध्ये दाखल होताच विराटचा एक व्हिडिओ आरसीबीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. यामध्ये तो कोरोना व्हायरसमुळे गोष्टी अनिश्चित झाल्याचं विराट म्हणाला आहे. 'आम्ही इकडे लवकर येणं दुर्दैवी आहे, पण कोरोनामुळे गोष्टी खूपच अनिश्चित झाल्या आहेत. कुठेही काहीही होऊ शकतं. इकडे आपण चांगलं, मजबूत आणि सुरक्षित वातावरणात राहू, अशी अपेक्षा आहे,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली. आयपीएलचा दुसरा राऊंड आरसीबीसाठीही महत्त्वाचा असेल, यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यासाठी मी उत्सुक आहे, असं विराट म्हणाला. अनेक खेळाडू दुसऱ्या राऊंडसाठी उपलब्ध नसले तरी आरसीबीने काही चांगले बदली खेळाडू घेतले आहेत, असं वक्तव्य विराटने केलं. आयपीएलच्या पहिल्या राऊंडमध्ये आरसीबीने 7 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला. पॉईंट्स टेबलमध्ये विराटची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीने दुसऱ्या राऊंडसाठी चार नवे खेळाडू निवडले आहेत. यामध्ये एडम झम्पाच्याऐवजी वानिंदु हसरंगा, फिन एलनऐवजी टीम डेव्हिड, केन रिचर्डसनऐवजी जॉर्ज गार्टन आणि डॅनियल सॅम्सऐवजी दुश्मंता चमिरा यांना संधी दिली आहे.
  Published by:Shreyas
  First published: