IND vs ENG : एजबॅस्टनमध्ये पुन्हा किंग झाला ऋषभ पंत, 79 वर्ष जुना विक्रम मोडला!
IND vs ENG : एजबॅस्टनमध्ये पुन्हा किंग झाला ऋषभ पंत, 79 वर्ष जुना विक्रम मोडला!
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये (India vs England 5th Test) ऋषभ पंतमुळे (Rishabh Pant) टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली. पंतने पहिल्या इनिंगमध्ये शतक केल्यामुळे भारताला 416 एवढ्या मोठ्या स्कोअरपर्यंत मजल मारता आली, यानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही पंतने अर्धशतक केलं.
मुंबई, 4 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये (India vs England 5th Test) ऋषभ पंतमुळे (Rishabh Pant) टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली. पंतने पहिल्या इनिंगमध्ये शतक केल्यामुळे भारताला 416 एवढ्या मोठ्या स्कोअरपर्यंत मजल मारता आली, यानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही पंतने अर्धशतक केलं. पंतच्या दोन्ही इनिंगमध्ये केलेल्या या कामगिरीमुळे भारताने इंग्लंडला शेवटच्या इनिंगमध्ये 378 रनचं आव्हान दिलं. बर्मिंघमच्या एजबॅस्टन ग्राऊंडवर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताची अवस्था 98/5 अशी झाली होती. यानंतर पंत आणि जडेजा यांनी शतकं केली.
पहिल्या इनिंगमध्ये 111 बॉलमध्ये 146 रन करणाऱ्या ऋषभ पंतने दुसऱ्या इनिंगमध्ये 86 बॉलमध्ये 57 रनची खेळी केली. या अर्धशतकासह पंतने बरीच रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली. 24 वर्षांचा ऋषभ पंत टेस्टच्या एका इनिंगमध्ये शतक आणि अर्धशतक करणारा फक्त दुसरा विकेट कीपर आहे. भारताचे माजी विकेट कीपर फारूख इंजिनियर यांनी इंग्लंडविरुद्धच 1973 साली असं रेकॉर्ड केलं होतं. त्यावेळी फारूख इंजिनियर यांनी 121 आणि 66 रनची खेळी केली.
सर्वाधिक रन करणारा दुसरा भारतीय खेळाडू
या सीरिजमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये ऋषभ पंत दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे.
रोहित शर्मा- 368 रन
ऋषभ पंत- 349 रन
केएल राहुल- 315 रन
पुजारा- 306 रन
जडेजा- 287 रन
धोनीची बरोबरी
एमएस धोनीच्या नावावरही इंग्लंडविरुद्ध दोन इनिंगमध्ये 50+ स्कोअर आहे. आता या यादीत पंतच्या नावाचाही समावेश झाला आहे. याशिवाय परदेशी विकेट कीपरच्या नावावर इंग्लंडमध्ये दोन्ही इनिंग मिळून पंतने केलेला हा सर्वाधिक स्कोअर आहे.
ऋषभ पंतच्या मागच्या 6 टेस्ट इनिंग
57(86)
146(111)
50(31)
39(26)
96(97)
100* (139)
भारतीय विकेट कीपरच्या एका टेस्टमध्ये सर्वाधिक रन
230 (192 & 38) बुधी कुंदेरन vs ENG, चेन्नई, 1964
224 (224 & DNB) एमएस धोनी vs AUS, चेन्नई, 2013
203 (146 & 57) ऋषभ पंत vs Eng, एजबॅस्टन, 2022
187 (121 & 66) फारुख इंजीनियर vs Eng, मुंबई, 1973
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.